गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्ब्यात ड्युटीचे कारण देत दरवाज्याला लटकत प्रवास करणाऱ्या होमगार्डला मनसे महिला कार्यकर्त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात झापले....
(प्रतिनिधी - शंकर जाधव)
आज सायंकाळी पावणे सहाची छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून टिटवाळा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या धीम्या गतीच्या लोकलमध्ये घडली घटना...मनसे कार्यकर्त्या रेखा देडिया ह्यांनी महिला डब्ब्याच्या मागच्या डब्ब्यातुन आपल्या मोबाईल मध्ये ही घटना केली कैद...डोंबिवलीत सायंकाळी ७ वाजता लोकल थांबल्यावर मनसे महिला कार्यकर्त्या रेखा देडिया आणि डब्ब्यातील महिलांनी विचारला त्या होमगार्डला जाब...होमगार्डच्या वर्दीवर नेमप्लेट नसल्याने महिला संतप्त..
दादरला ड्युटीवर असल्याचे त्या होमगार्डने कारण सांगताच देडिया यांनी महिला डब्ब्यात महिला पोलीस असणे आवश्यक असताना तुम्हाला या डब्यात गर्दीच्या वेळी प्रवास करण्याचे काय कारण? अश्या शब्दात विचारला जाब..डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी अमित मिश्रा यांनी सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या होमगार्डच्या घेणार शोध...
This comment has been removed by the author.
ReplyDeleteGN
ReplyDeletePost a Comment