१५  आँगस्ट स्वांतञदिनाच्या निमत्ताने मुंबई डेटलाईन 24 वेब न्यूज चँनेल शहापुर प्रतिनिधी चेतन भोईर यांनी विद्यार्थ्यांना केले राष्ट्रध्वजाचे वाटप  


( मुंबई डेटलाईन 24 टीम )

 

शहापूर:देशात सर्वत्र आपल्या भारतदेशाचा स्वांतञदिन आज उत्साहात साजरा होत असताना मुंबई डेटलाईन24 वेब न्यूज चँनेल शहापुर प्रतिनिधी चेतन भोईर यांनी देखील या आंनंदत्सोवाचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना कळावे यासाठी धसई जिल्हा परिषेद शाळेत राष्ट्रध्वजाचे वाटप केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी या विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी सूचनाही केल्या. त्याचबरोबर देशासाठी बलिदान करणाऱ्या थोर पुरुष यांविषयी तसेच भारतीय सीमेवर देशरक्षणार्थ शहीद होणाऱ्या वीरांचे देखील यावेळी स्मरण करून देण्यात आले. यावेळी    संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा व संभाजी ब्रिगेड शहापुर तालुक्याच्या वतीने देखील  झेंडे व बँच वाटप कार्यक्रम करण्यात करण्यात आला. या उपक्रमाचे शाळेतील शिक्षकांनी कौतुक केले.


या कार्यक्रमाप्रसंगी शहापूर तालुकाध्यक्ष विशाल धिर्डे , तालुका कार्याध्यक्ष साईनाथ कनकोशे,तालुका सचिव नितिन विशे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत ञिखंडे वासिंद विभाग प्रमुख गणेश चौंडकर, खर्डि विभाग प्रमुख तुषार बोद्रे, राज उबाळे व प्रथमेश घनघाव  यांसह अनेक कार्यकते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post