आत्मविश्वास हीच शक्ती आहे-कवी नवनाथ रणखांबे
कल्याण : आर्ट्स स्टडी सेंटर आयोजित आर्ट्स ,कॉमर्स आणि सायन्स साकेत कॉलज कल्याण येथे करिअर गाईडन्स लेक्चर मध्ये प्रमुख मार्गदर्शक पाहुणा म्हणून कवी नवनाथ रणखांबे यांनी आत्मविश्वास हीच शक्ती आहे .ध्येय ठेवून योजना करा ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा.असे मत व्यक्त केले.तसेच आपले जीवन संघर्ष वाटचाल सांगितली . आपले अनुभव सांगून यशस्वी होण्याचे मार्ग सांगितले.
कॉलेजच्या आठवणीत प्राध्यापक आणि कॉलेजचे ऋण व्यक्त केले.
प्राचार्य प्रा.डॉ.एस.के राजू यांनी विदयार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी कवी नवनाथ रणखांबे यांचा भेट वस्तू देऊन सन्मान केला.
कार्यक्रमास प्रा. डॉ. शहाजी कांबळे, प्रा. प्रिया नेर्लेकर, प्रा. प्रणाली भोसले, प्रा. नवनाथ मुळे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शहाजी कांबळे यांनी केल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
Post a Comment