स्वातंत्र्यदिनी ‘आयडे’ आणि ‘एक दिलासा’ समाजिक संस्थेनी आणले त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य  





दि.१५.(टिटवाळा- मुंबई डेटलाईन 24 टीम ) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या टिटवाळा येथील एक दिलासा सामाजिक संस्थाआणि ठाणे येथील आयडे सेवा संस्थाया संस्थांच्या वतीने टिटवाळा नजीकच्या म्हसकळ गावालगतच्या घोडाखडक या आदिवासी ठाकूरपाड्यावरील आदिवासी मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.             कपडे घेऊन पाड्यावर आलेल्या संस्थेच्या सदस्यांना पाहून “मांगच्या वर्षी आपल्या सगल्यांना कपडे दिएले होते ना ते दादा परत आलेत नवीन कपडे घेऊन ये चला सगळी” असे म्हणत पाड्यावरील मुलांनी आनंदाने उड्याच मारू लागली.


‘आयडे’ संस्थेचे संस्थापक महेंद्र फल्ले  आणि ‘एक दिलासा’ संस्थेचे संस्थापक अजय शेलार यांनी आम्ही आम्ही आमच्या संस्थेच्या  माध्यमातून दरवर्षी स्वातंत्र्यदिन व  प्रजासत्ताकदिन पाड्यावरील मुलांसोबत साजरा असतो. यातून फार मोठे समाधान मिळते केवळ झेंडा लावून देशप्रेम दाखवण्यापेक्षा प्रत्येकाने अश्या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे आणि हीच खरी देशसेवा आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिन म्हणजे सुट्टीचा दिवस ही भावना अनेकांची बनत चालली आहे.त्यामुळे अश्या सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश आम्ही आमच्या परीने देत असतो.अश्या भावना आयडे सेवा संस्थेच्या  महेंद्र फल्ले ,अजित सावंत(बाबू) आणि राजेश वर्मा यांनी व्यक्त केल्या.  तर या कार्यक्रमासाठी एक दिलासा संस्थेचे सभासद आरती पोटावे, संदीप महारुगडे, विकेश भोर ,दर्शना शेलार, स्वरा शेलार   यांचे महत्वाचे योगदान लाभले.      

2 Comments

  1. Sirji u had really explain the meaning of 15th Aug,ppl assume it's as holiday...but salute to ppl and ur team members and associate for making the poor ppl happy day of life.ajay ji and all others wish u a happy independence day.regards Surendra salve.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद साळवे साहेब

      Delete

Post a Comment

Previous Post Next Post