खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनातर्फे  सत्कार

(मुंबई डेटलाईन24 डोंबिवली प्रतिनिधी - शंकर जाधव ) 

     
सलग दोन वर्षे लोक सहभागातून हजारो हातांच्या सहकार्याने १ लाख ६० हजार वृक्षांचे रोपण आणि १० गावांमधील गावतलाव आणि बंधाऱ्यांमध्ये २५ वर्षांपासून साचलेला गाळ लोकसहभागातून काढून पाणीटंचाईवर मात करण्याबरोबरच शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामात भाजीपाल्याची लागवड करून त्यांचे जीवनमान सुधारण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा १५ ऑगस्ट निमित्त राज्य सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण अभियान, तसेच जलसंधारणाच्या कार्यात सहभागी झालेले हजारो लोक, संस्था आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारत असल्याची भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.


Post a Comment

Previous Post Next Post