जिल्हा परिषद केंद्र शाळा कवाड येथे ७२ वा स्वतंत्रता दिन उत्साहात,जल्लोषात साजरा.
(मुंबई डेटलाईन24 कवाड प्रतिनिधी - कल्पेश कोरडे)
"आत्ता करा करा एकच काम"
"बिडी सिगारेट राम राम"
या प्रकारच्या घोषणा देत समाज जागृतीच अनोख काम प्रथमताच लहान वीर जवानांनी केल्याबद्दल संपूर्ण कवाड गावातून तसेच परिसरातून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप पडत होती.स्वातंत्र्यदिनाच्या पहाटेची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी कवाड गावातून प्रभात फेरी काढून केली.प्रथमता ग्रुप ग्राम पंचायत कवाड येथे "तिरंगा" फडकवत शालेय विद्यार्थी , शिक्षक तसेच ग्रामपंचायत कवाड सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी ७२ व्या स्वतंत्र्य दिनाचे जल्लोषात स्वागत केले. यासोबतच जिल्हा परिषद केंद्र शाळेत मा.उपसरपंच निलेशजी गुरव साहेब यांच्या हस्ते व शेकडो विद्यार्थी , शिक्षक गण व ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. सोबतच कवाड शाळेतील एक "वैज्ञानिक प्रयोगशाळेची" कमतरता भरुन काढत "संस्कार ग्रुप घाटकोपर" सदस्यांचे हस्ते नविन प्रयोग शाळेचे उद्घाटनही या सुवर्ण दिनी झाले.
"भाग्यवान ती माता आन भाग्यवान तो महाराष्ट्र
जो ऐसा एक एक जवान अर्पण करीतो
या वीर पवित्र भुमीसाठी"
अश्या शब्दांत "शहिद वीर जवान कौस्तुभ राणे" यांना समस्त कवाड गाव तसेच विद्यार्थी गणांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यानंतर जि.प.केंद्र शाळेच्या सर्व आजी-माजी शिक्षकवृंदाचे ही त्यांच्या अतुलनिय योगदानासाठी पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला. सोबतच शिष्यवृती परिक्षेत राज्यस्तरिय नामांकनात आपलं नाव कोरुन "जवाहर नवोदय विद्यालयातील" प्रवेश प्रक्रियेत निवड झाल्याबद्दल व सोबतच शाळेचेही नाव लौकिक करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा ही जल्लोषात पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला. त्यापैकीच १) सानिका रोहिदास कोरडे २)मयुरेश राकेश गुरव ३) विवेक संतोष उगले अशी विद्यार्थ्यांची नावे असून सध्या हे विद्यार्थी पालघर जिल्ह्यातील "जवाहर नवोदय विद्यामंदिरात" आपल पुढील शिक्षण घेत आहेत. सदरिल पुरस्कार हे त्यांच्यावतीने त्यांच्या आई-वडिलांना प्रदान करण्यात आले.
__________________________________________________________________________________________________________________________________________________
=====================================================================
=====================================================================
=====================================================================
Post a Comment