कल्याणच्या सूचकनाका येथील स्वर्गीय आनंद दिघे
रिक्षा स्टॅडवर भारतीय सैन्यदलातील रिटायर जवानाच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण.
( कल्याण : मुंबई डेटलाईन 24 टीम )
कल्याणच्या सूचकनाका येथील स्वर्गीय आनंद दिघे
रिक्षा स्टॅडवर भारतीय सैन्यदलातील रिटायर जवान केशव घाडगे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी
ध्वजारोहण करण्यात आले. केशव घाडगे यांचे वय
आता ७८ वर्ष आहे. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी देशसेवा करत असतना आपल्या सैन्यदलातल्या अनेक आठवणीना उजाळा दिला.
१९६२
साली केशव घाडगे सैन्यदला भरती झाले. त्यानंतर १९७१, १९६२, १९६५ साली हरिद्वर, देहराधून,वाघबोडर, नागालँड, येथे त्यांनी सेवा बजावली. ज्या काळी बांगालादेश हा पाकिस्तानमध्ये होता त्या वेळी बांगलादेशालाला
स्वातंत्र्य मिेळवून देण्यासाठी १९६२ आणि १९६५ ला पाकिस्तान सोबत केलेल्या ३ युद्धांत
केशव घाडगे यांचा सहभाग होता . त्यानंतर १९७८
ला ते रिटायर झाले. “ स्वातंत्र्याचे सर्वात
जास्त महत्व जर कोणाला ठाऊक असेल तर ते देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांना,
शहीद झालेल्या जवानांना आणि आता देशरक्षणार्थ
सीमेवर लढत असलेल्या जवानांना” बाकी परिस्थिती खेदजनक असल्याची खंतही त्यांनी
यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रहारसंघटना कल्याण कार्याअध्यक्ष मनोज वाघमारे
यांसह ,सोन्या पाटील,प्रेमनाथ यादव ,सलीम शेख , धनराज सूर्यवंशी ,विजय म्हात्रे, सुभाष आवळे आदीजण उपस्थित होते.
Post a Comment