महत्वाकांक्षा सेवा संघ व धूमकेतू टेकर्स यांच्या संयुक्त
विद्यमाने सायकल दान अभियान
(मुंबई डेटलाईन 24 वेब न्यूज टीम ) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य
साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही 10 अ 1988 बॅच विद्यामंदिर शाळा,विक्रोळीच्या विद्यार्थीनी सामाजिक
बांधिलकी जपत महत्वाकांक्षा सेवा संघ व धूमकेतू टेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने
सायकल दान अभियान व शैक्षणिक साहित्य वाटप करत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या सोनशिव
जिल्हा परिषद शाळेतील मुलांना एक वेगळा आनंद दिला.
"प्रगतीची चाके
गावाकडे वळवूया,चला सायकल दान करूया" या उपक्रमांतर्गत अनुषंगाने डोंगरदऱ्यातून शिक्षणाचे बाळकडू घेण्यासाठी
धडपडणाऱ्या आदीवासी मुलांच्या आयुष्याचे भविष्य उज्ज्वल व गतिमान होण्यासाठी मुंबई
व ठाणे जिल्ह्यातून घरातील जुन्या वापरात नसलेल्या जमा केलेल्या सायकली दुरुस्ती
करून चालू स्थितित एकुण 51 सायकली , शैक्षणिक साहित्य तसेच डोंगरदऱ्यातून येणाऱ्या आदिवासी मुलांना
सँडेलचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी आलेल्या मान्यवरा सोबत घेऊन गाऊन व नाचून आनंद द्विगुणित केला.
शाळेचे मुख्याध्यापक नामदेव जाधव सर, विजय गोरे व इतर शिक्षक यांनी आलेल्या
सर्व मान्यवरचे पुष्प देऊन स्वागत केले.मनोज डाकवे यांनी सायकल दान व वाटपासाठी
आणलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती दिली तर अरुण हांडे व प्रमोद नांदगावकर यांनी
मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.चंद्रकांत पाटील,शाळा केंद्रप्रमुख, बाळीवली, पालघर ,डॉ भाई वलते,अध्यक्ष-वाडा विभाग डॉक्टर असोशियसन व योगेश पाटील यांनी
विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. सायकल दाना बरोबर
सायकलीची निगा कशी राखावी? या बाबत संदीप भाऊ यांनी मुलांना
प्रात्यक्षिक करून दाखविले.
सदर सायकल दान हस्तांतरण व शैक्षणिक साहित्याचे वाटपाचे कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी प्रशांत डोर्लेकर,अतुल भगत,शेखर शेट्टी,
दत्तात्रय ठाकूर,विलास शिंदे,
चारुशीला भोसले,मानसी पारकर,प्रविणा सावर्डेकर, किशोर सावर्डेकर ,वैशाली शिंदे, चित्तरंजन तळेकर,राखी म्हात्रे,वैदेही नांदगावकर,श्री,आर्णव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment