बाधितांचे पुनर्वसन करा, नंतरच विस्थापन करा ...
राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुनावले...
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेने केलेल्या सर्वेत बाधित झालेली डोंबिवली पूर्वेकडील संगीतावाडी येथील जैन मंदिर ते नेरुरकर रस्तावरील किशोर निवास इमारत जमीनदोस्त करण्याची नोटीस पालिका प्रशासनाने इमारतीचे मालक किशोर भगत यांना बजावली होती. पागडी पद्धतीच्या या इमारतीतीत राहणाऱ्या ५६ कुटुंबियांना एन दिवाळीत बेघर होऊ का अशी भीती वाटत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी आणि महिलावर्गानी शुक्रवारी सकाळी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी रहिवाश्यांनी `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची भेट घेतली. शनिवारी रहिवाश्यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. बाधितांचे पुनर्वसन करा, नंतरच विस्थापन करा असे यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी कुमावत यांना सांगितले.
४० वर्ष जुनी असलेल्या या इमारतीचे मालक किशोर भगत असून आता या इमारीतीतील कुटुंब कुठे राहण्यास जाणार ? विकासाला आमचा विरोध नाही परंतु आधी आमचे पुर्नवसन करा, त्यानंतर इमारतीवर कारवाई करा असे रहिवाशी प्रसाद सावंत पालिका अधिकारी कुमावत यांची भेट घेऊन सांगितले होते. शासनाने ३ सप्टेंबर २००५ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर केला. त्यानुसार संगीतावाडी येथील जैन मंदिर ते नेरुरकर रस्त्यापर्यत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणात सदर इमारत येत असल्याने पालिकेने इमारतीचे मालक किशोर भगत यांना ४ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली होती. सदरचे बांधकाम पडून सदर जागा रस्त्यासाठी का घेण्यात येऊ नये ? याबाबतचा लेखी खुलासा २६ ऑक्टोबर रोजी द्यावा असे नोटीस मध्ये लिहिले आहे.त्यानुसार शुक्रवारी इमारत मालक भगत यांनी कुमावत यांची भेट घेतली होती. शनिवारी रहिवाश्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी कुमावत यांना फोन करून शहरातील पायाभूत सुविधा,विकास कामे करीत असताना अनेक दशके रहिवास करणा-या इमारतीमधील बाधित नागरिकांचे प्रथम पुनर्वसन करा नंतरच त्यांचे विस्थापन करा असे सांगितले. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची बुधवारी सदर इमारतीतील रहिवाशी भेट घेणार आहेत.
Post a Comment