कोकण रहिवाशी मंडळातर्फे . १० वी व १२वी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
टिटवाळा :(मुंबई डेटलाईन24 टिम) येथील मांडा ,इंदिरा नगर,सावरकर नगर आदी परिसरांत राहणाऱ्या कोकणातील काही समाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींनी एकत्र २०१५ साली कोकण रहिवाशी मंडळाची स्थापना केली . बघता बघता २५० च्या वर सभासद हे या मंडळाशी जोडले गेले . कला, क्रीडा, आरोग्य,शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक या माध्यमातून त्यांनी उपक्रम राबवायला सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून
१० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देउन गौरविण्यात आले . भावी जिवनात आयुष्याची वाटचाल कशी असावी याबाबत उपस्थित मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्श केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद नांदगावकर यांनी केले . याप्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपमहापौर उपेक्षा भोईर, सभापती श्रीसमेळ, गणेश मंदिर विश्वस्त सुभाष जोशी,भाजपा मोहना मंडळ सरचिटणीस शक्तीवान भोईर, गजानन पंडित,डॉ योगेश कवठे,संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशेकर कांतीलाल वरकुटे,दिलीप राठोड,किरण समेळ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. "यापुढेही आपण कोकण रहिवाशी मंडळाच्या माध्यमातुन मी आणि माझे सहकारी एक कोकणवासी या नात्याने अश्याच सामाजिक उपक्रमाच्या द्वारे कोकणच्या मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत" अश्या भावना यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत परब(बुवा) यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment