ऋषिकेशच्या उपचारासाठी शिवसेनेचा मदतीचा हात
"खासदार डॉ. श्रीकांत शिंदे" देवासारखे धावून आले ...कृतज्ञेपोटी मातेचा गहिवर ....
डोंबिवली :- दि. १४ (मुंबई डेटलाईन 24 प्रतिनिधी - शंकर जाधव )
आपल्या मुलाला त्या मातेने किडनी देण्याचा निर्णय घेतला... मात्र त्यासाठी उपचाराचा खरच अफाट असल्याने त्या मातेला चिंता लागली होती. अशा वेळी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देवासारखे धावून आले. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैदकीय मदत कक्षातून ऋषिकेश आहिरे यांना आर्थिक मदत करण्यात आली असून त्यामुळे उपचारासाठी होणारा खर्च अर्धाधिक कमी झाला.या मदतीबद्दल त्या मातेने खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले आहेत.
लक्ष्मी आहिरे यांना महिना २ हजार रुपये तर त्याचे पती कडू आहिरे हे सुरक्षा रक्षक असून त्यांना महिना १० हजार रुपये पगार असून त्यांचा मोठा मुलगा ऋषिकेश ( ११ ) याला आईने १० मे रोजी कोकिळाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण केले. यासाठी आठ लाख रुपये खर्च असल्याने लहान भाऊ शशिकांत आहिरे यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष मिथुन खोपडे, विठ्ठल कदम, नरेद्र आहिरे यांना यांची माहिती दिली.त्यांच्याकडून ७० हजाराची मदत मिळाली. टिटवाळ्यातील इंदिरानगर येथे लक्ष्मी राहत असल्याने त्यांनी घरोघरी जाऊन आपल्या मुलाच्या उपचारासाठी मदत मिळावी या उद्देशाने आर्थिक दान मागितले. त्यातून त्यांना ४० हजार रुपयांची मदत मिळाली.तसेच राष्ट्रीय विद्यालय शाळेतून १५ हजाराची मदत मिळाली.कल्याण पश्चिम मतदार संघाचे आमदार नरेंद्र पवार यांनीहि त्यांना २ लाखाची मदत केली. मात्र एवढे करूनही उपचारासाठी होणाऱ्या खर्चाच्या अर्धी रक्कम कशी उभी करणार असा प्रश्न आहिरे यांना पडला.लक्ष्मी यांनी उपशहरप्रमुख तथा परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांना संपर्क केला. त्यावेळी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नंबर लक्ष्मी यांना दिला. लक्ष्मी यांनी खासदार डॉ. शिंदे यांना फोन करून आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने सांगितले.खासदार यांनी मदतीच्या हात पुढे करत उपचारासाठी उर्वरित रक्कम ४ लाख रुपये हॉस्पीटल फोन करून कमी केले. डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता कडू आहिरे , लक्ष्मी आणि ऋषिकेश यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट घेऊन आभार मानले. तसेच आपल्या मुलाला किडनी प्रत्यारोपण करून जीवदान देणाऱ्या मातेचा १३ ऑगस्ट या जागतिक अवयवदान दिनानिमित्त मुंबईत प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन आणि टीना अंबानी यांनी गौरव केला.
Post a Comment