प्राचीच्या झाडेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कोपरी संघर्ष समीतीच्या वतीने कॅण्डल मार्च 

( मुंबई डेटलाईन 24 - ठाणे प्रतिनिधी- गणेश खरात)

काही दिवसांपुर्वी ठाण्यात जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम. ला शिकत असलेल्या  प्राची झाडे या  20 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन निर्घूण हत्या करण्यात आली होती. ठाण्यातील हाजुरी परिसरात आरटीओ ऑफिसजवळच्या रस्त्यावरुन जात असताना प्राचीवर एका तरुणाने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. प्राचीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कोपरी संघर्ष समीतीच्यावतीने १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता बारा बंगला ते ठाणे स्टेशन पुर्व आनंद टॉकीज या मार्गे एका कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले असुन " एक लढाई तुमच्या आमच्या मुलींच्या रक्षणासाठी एक लढाई न्यायासाठी" अशी साद घालत समस्त ठाणेकरांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोपरी संघर्ष समीतीच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post