(प्रतिनिधी- कल्पेश कोरडे-भिवंडी )
भिवंडीमधील पालिका प्रशासनाच्या हद्दितील गायत्रीनगर येथे जलविभागाचा गलथानपणा पुन्हा एकदा उघड झाल्याचे आढळून आले आहे.पालिका प्रशासन घरपट्टीच्या व पाणीपट्टीच्या नावाने वर्षाकाठी कोटींच्या घरात कर वसूल करत असते. मात्र असे असतानाही योग्य त्या सोयी सुविधा देण्यात असक्षम ठरत आहे.
गेले अनेक दिवस गायत्री नगरमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रत्यावर अन नाले गटारांमध्ये विसर्जित होत असुन या सर्व प्रकारास त्या विभागातील लोकप्रतिनीधी व पालिका प्रशासनाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. अनेकदा तक्रारी करुनसुद्धा संबंधित पाणी पुरवठा करणारी लाईन दुरुस्त करण्यात आलेली नाही. सदरिल पाईप लाईन फुटल्याकारणे लाखो लिटर पाणी तर वाया जातचं पण सोबतच दुषित सांडपाणी व पावसाच पाणी सरळ सरळ पिण्याच्या पाईप लाईन मधून ग्रामस्थांच्या घरात जाते. आणि हेच दुषित पाणी पिऊन असंख्य लोक रोग राईला बळी पडत आहेत. मात्र बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी याकडे एकदुसऱ्याकडे बोट दाखवून कानाडोळा करत येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.
या समस्येबाबत येथील स्थानिक नागरिक पुन्हा एकदा संबंधित प्रशासकीय विभागास निवेदन देणार असुन मात्र त्यानंतरही तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment