महिलासक्षमीकरण तसेच महिलांसंदार्भातील कायदेविषयक जनजागृतीसाठी टिटवाळा येथे महिलांसाठी एकदिवसीय  प्रशिक्षण कार्यशाळा शिबीर संपन्न 

टिटवाळा : आजच्या युगात सर्वच क्षेत्रात पुरुषां इतकेच स्त्रीयांनी देखील आपले असामान्य कर्तुत्व दाखवत स्वत:ला सिद्ध केले आहे.  कुठल्याच क्षेत्रात आज स्त्रीया मागे नाहीत . घर-दार आणि चुल-मुल या मर्यादित परिघा बाहेर त्या अनेक  क्षेत्रात आपल्या गुणवत्तेने विस्तारत आहेत. मात्र असे असतानाही समाजात वावरताना महिलांना आजही बऱ्याच ठिकाणी शोषण,अत्याचार यांसारख्या घटनांना बळी पडावे लागते. शिक्षण आणि कायद्याचे अज्ञान असलेल्या स्त्रीयांना तर पावलोपावली समाजातील विकृत आणि अपप्रवृत्ती असलेल्या आजुबाजुच्या  वातावरणाला सामोरे जावे लागते .यातूनच अनेक मोठ्या घटना आणि नको असलेले प्रसंग त्यांच्या वाट्याला येतात अश्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीया , युवती तसेच लहान मुली यांच्यात अनेकदा यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. म्हणूनच स्त्रीयांमध्ये अश्या घटनांविषयी प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण व्हावी  तसेच महिला अत्याचार प्रतिबंध विरोधी  तसेच त्यांच्या संरक्षणाबाबत असलेल्या कायद्यासंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी यासाठी महिला व बालविकास आयुक्त महारष्ट्र राज्य पुणे आणि महिला समुपदेशन केंद्र कल्याण तालुका पोलिस स्टेशन मांडा टिटवाळा संचालित महिला विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शिबीर  येथील प्रथमेश हॉल येथे  आयोजित करण्यात आले होते .

 या शिबिराचे उद्घाटन ठाणे ग्रामीणचे डी.वाय.एस.पी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.महिला साक्षमीकरण या विषयवावर त्यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी  विविध समाजिक संस्थेशी संलग्न राहत गेली १५ वर्ष समाजिक कार्यात असलेल्या  ॲड. सुनीता कांबळे यांनी आयोजित या शिबिरात उपस्थित महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २०१५ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तर बिटवीन द लाईन एनजीओच्या अध्यक्षा मानसशास्त्रज्ञा प्रेरणा महाजन यांनी लैंगिक अत्याचार म्हणजे काय व त्याचे स्वरूप , विशाखा प्रकरण याविषयी प्रेरणा महाजन यांनी मार्गदर्शन केले.  त्याचबरोबर मनोधैर्य योजना व डी.एस.सी. योजना आणि नियोजन या विषयावर संरक्षण अधिकारी  महिला व बालविकास विभाग जिल्हा ठाणे येथे गेली ४ वर्ष कार्यरत असलेल्या आशा सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात छाया गरुड यांनी महिलांना कागदी पिशव्या आणि हस्त कलेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. स्त्रियांवरील हिंसाचाराचे स्वरूप व उपाय यासंबंधी लक्ष्मी यादव यांनी सदर विषयाचे गांभीर्य महिलांना पटवून देत त्याविषयी मार्गदर्शन केले. महिला विकास केंद्र (NGo)अध्यक्षा व महिला आयोग महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणेच्या समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या तसेच महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य महिला समुपदेशन केंद्र मांडा टिटवाळा पोलीस स्टेशन येथे समुपदेशक म्हणून काम पाहत असलेल्या हिरा कांबळे यांनी "महिला सबलीकरण व एक छोटीशी भूमिका" या विषयावर महत्वपूर्ण असे सादरीकरण केले.

 मनीषा जाधव, प्रतिभा खुजे,जुलेखा खान,डिसुजा, वनिता म्हात्रे यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा माळी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  हिरा कांबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील वहाणे, विजय बाविस्कर, अनिता म्हात्रे, प्रतिभा खुजे,शिला नवाळे,सोनल कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post