आणि सगळ्यांनीच  टाकला सुटकेचा नि:श्वास 
टिटवाळयातील जाळपोळ ...पोलिसांची धावपळ....त्यांचे हसू... आणि कौतुक... 

टिटवाळा:( मुंबई डेटलाईन 24- संपादक : अजय शेलार )

ध्या राज्यभर आंदोलनाचे वारे चालू आहेत. अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. असे असताना टिटवाळा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बल्याणी चौकात काही लोकांनी टायर जाळत  रस्ता रोको केल्याचा एक फोन टिटवाळा पोलीस स्टेशनला आल्यानंतर तेथील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांची एकाच पळापळ झाली.मात्र हा सगळा प्रकार दंगा काबू  पथकाची ज्याला ( मॉब ड्रील) असेही म्हणतात त्याची  रंगीत तालीम असल्याचे समजल्यावर तेथील सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल दुपारी ३: ४५ च्या दरम्यान  टिटवाळा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बल्याणी चौकात काही लोकांनी टायर जाळत  रस्ता रोको केल्याचा एक फोन टिटवाळा पोलीस स्टेशनला आला आणि बघता बघता पोलीस स्टेशनमध्ये एकच धावपळ बघायला मिळाली. सगळे अधिकारी,कर्मचारी क्षणार्धात अलर्ट झाले. टिटवाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या पथकाचा फौजफाटा घेऊन येथील बल्याणी चौकात पोहचले . तेथे जळत असलेला टायर विझवण्यात आला. सगळी पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली होती. मात्र तेथील वातावरण नंतर अचानक काही क्षणांतच खेळीमेळीचे झाले. कर्मचार्यां चेहऱ्यावर चक्क हसू होते. मात्र कर्मचारी का हसत आहेत हे कळायला वेळ लागला नाही कारण हा सगळा प्रकार दंगा काबू  पथकाची ज्याला ( मॉब ड्रील) असेही म्हणतात त्याची  रंगीत तालीम असल्याचे लक्षात आले. मात्र ही तालीम करत असताना या तालमीत सहभागी असलेले पोलिस निरीक्षक केशव नाईक आणि त्यांचे सह कर्मचारी यांनी टिटवाळा पोलीस स्टेशनची सतर्कता तपासून पाहण्यासाठी  त्याची चाचणी घेण्यासाठी कमालीची गुप्तता पाळली . त्यामुळे सर्व कर्मचारी वर्गाचे याबाबत वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले. राज्यभर चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  आपल्या परिसरातील पोलीस यंत्रणा किती सतर्क आहे  हे जाणण्यासाठी दंगा काबू  पथकाची  ( मॉब ड्रील) ची चाचनी घेण्यात आल्याचे टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक केशव नाईक यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post