दयानंद किरतकर आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावतील
--- बसपा प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे
(
डोंबिवली प्रतिनिधी - शंकर जाधव )
दयानंद किरतकर यांची समाजात चांगली प्रतिमा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तीचा त्यांचाशी घनिष्ठ संबंध आहे. समाजात त्यांच्याबद्दल आदर आहे. असा नेता बहुजन समजला मोठे केल्याशिवाय राहणार नाही. किरतकरांवर विस्वास असून आगामी निवडणुकीत ते महत्वाची भूमिका निभावतील असा ठाम विश्वास व कौतुक बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी व्यक्त केले.
डोंबिवली येथील पी.पी. चेंबर मधील बँकेट हॉल येथे बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यावेळी साखरे बोलत होते.यावेळी वाढदिवस सोहळ्याला शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, जी.टी. शिंदे, के.एल. जाधव, बसपाचे महासचिव प्रशांत इंगळे, राम सुमेर जैसवार, राजेश कांबळे, माजी नगरसेवक रवी पाटील आणि युग फॉऊंडेशनच्या सर्वेसर्वा कल्पना किरतकर, युगांध किरतकर, मनोज किरतकर, पराग वाघमारे, तृष्णा वाघमारे. डॉ. रश्मी दाहिंजो उपस्थित होते. किरतकरांना शुभेच्छा देताना नाट्य, मालिका, सिने क्षेत्रातील कलावंत किरण भालेराव म्हणाले की, समाजकार्य, राजकीयकार्य व आपला व्यवसाय हे तिन्हही क्षेत्र वेगवेगल्या स्तरावर किरतकर हातालत असतात. समाजकार्य करताना एका विशिष्ट उर्जास्त्रोने काम करीत असतात. बसपा सारख्या पक्षात काम करताना, मायावती सारख्या नेतृत्वाखाली काम करताना व आंबेडकरी विचारांची चळवळ उभी करताना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी समाजाचे ऋण फेडावे हा विचार असतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याखाली झटून उभे रहावे हा साहेबांचा गुण वाखाखण्याजोगा आहे. या गुणामुळे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. व्यवसाय व समाजकार्य यांचा मेळ त्यांनी साधला आहे. शासकिय यंत्रणेचा अभ्यास करुन गरीबांना व मध्यमवर्गीयांना परवडतील अशी घरे त्यांनी उपलब्ध करुन दिली. यावेळी अनिल खंडागळे यांच्या वाद्यवृदाने उपस्थित किरतकर प्रेमींची मने जिंकली. ‘तुम जिवो हजारो साल’ असे म्हणत उपस्थित सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
Post a Comment