रेल्वे रुळालगत सापडलेल्या त्या बाळाच्या माता-पित्याचा शोध घेण्यासाठी टिटवाळा पोलिसांचे आवाहन
टिटवाळा:- टिटवाळा ते आंबिवली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान येणाऱ्या बल्याणी परिसरात रेल्वे रुळालगत दिनांक २८ ऑगस्ट रोजी ११:३० च्या दरम्यान स्त्री जातीचे २५ दिवसांचे अर्भक एका ठिकाणी झाडाझुडुपांच्या गवत असलेल्या परिसरात पालकत्व लपविण्याच्या किंवा सांभाळ करण्यास असमर्थ असल्याकारणास्तव परित्याग करण्याच्या उद्देश्याने सोडून देण्यात आले होते. पासून काही अंतरावर बल्याणी परिसरात एका महिन्याचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक माळरानावर गवतात सापडून आले होते. या संदर्भात टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असून . रंगाने सावळी,उंची ४० सेंमी,अंदाजे वय २५ दिवस,अंगात एक निळ्या रंगाची शाल गुंडाळलेली, त्यावर फुलांची डिझाईन असलेला कपडा, अंगात फिकट गुलाबी रंगाची बंडी,दोन्ही हातात काळ्या रंगाचा धागा अश्या वर्णाच्या बालिकेचा परित्याग करणाऱ्या माता-पित्याबाबत कोणाला माहिती असल्यास त्याबाबत टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपर्क : कल्याण तालुका पोलिस स्टेशन : ०२५१२ ३८१३२०
Post a Comment