टिटवाळयातील व्हाटसअपकरांच्या  समाजिक बांधिलकीचा हात पोहचला रायगडला...

================================================
टिटवाळा :( अजय शेलार )  सोशल मिडीयाच्या काळात जाणीवा , संवेदना , बांधिलकी हे सगळे दुरापास्त होत असल्याची ओरड  नेहमीच होत असते. मात्र याला अपवाद ठरत समाजिक उपक्र्मांसाठी सोशाल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन आल्यानंतर  टिटवाळाकर नेहमीच धावून येत असल्याचे पाह्यला मिळत आहे.  कोणाच्या उपचारासाठी आर्थिक मदत असो अथवा वा  कोणाच्या शिक्षणासाठी मदत असो, अथवा जखमी मुक्या जनावरांच्या उपचारासाठी मदत असो टिटवाळाकरांनी आपली समाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे. टिटवाळयातील अनेक समाजिक संस्था आप-आपल्यापरीने विविध समाजिक उपक्रम राबवत आहेत, मात्र सोशल मिडीयावर वावरणारे टिटवाळयातील व्हाटसअपकर मंडळी देखील समाजिक बांधिलकी जपत समाजाच्या मदतीसाठी हिरारीने आणि उत्स्फुर्तपणे पुढे येत आहेत,   अश्याच प्रकारे  एक दिलासा सामजिक विकास संस्थेच्या माध्यमातुन संस्थेचे  संस्थापक अजय शेलार यांनी सोशल मिडियाव्दारे रायगड जिल्हातील तळा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर टिटवाळयातील व्हाटसअपकरांच्या  समाजिक बांधिलकीचा हात रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातल्या आदिवासीवाड्यांतील शाळेपर्यंत पोहचला .त्याचबरोबर टिटवाळयासह मुंबई ठाण्यातुन देखील यासाठी  उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 

 मागील महिन्यात टिटवाळा येथील एक दिलासा संस्थेच्या सचिव दर्शना शेलार यांना रायगड जिल्हातील तळा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्याची गरज असल्याचे कळाले. त्यानंतर संस्थेचे  अध्यक्ष  अजय शेलार आणि सचिव दर्शना शेलार यांनी लवकरात लवकर शाळेला मदत मिळवून देऊ असे सांगितले. मात्र दिलासा संस्थेला आर्थिक मर्यादा आल्यानंतर त्यांनी टिटवाळा तसेच कल्याण , ठाणे ,मुंबई या ठिकाणी आपल्या संपर्कातील इतर संस्था आणि दानशूर व्यक्ती यांना रायगडच्या शाळांसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीचे  आवाहन केल्यानंतर  त्या आवाहनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत टिटवाळा परिसरातील  केबीके इंटरनॅशनल स्कुलच्यावतीने सुबराव खराडे  ,समाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करणारे सामजिक कार्यकर्ते अनिल महाजन,ॲडव्होकेट जयेश वाणी,  प्रमोद नांदगावकर यांनी तसेच कल्याण येथील टीम परिवर्तन संस्थचे अविनाश पाटील आणि तळागाळातल्या वंचित घटकांसाठी न्यु प्रगती शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या  ठाणे येथील अनिता ताई खरात यांनी तत्काळ  मदत पोहचवली.  त्याचबरोबर कांजुरमार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश भरत लवंगारे यांनी देखील यासाठी आपले योगदान दिले. अपेक्षित साहित्य जमा झाल्यानंतर या साऱ्यासमाजिक  संस्था आणि दानशूर व्यक्तीनच्या वातीने  'एक दिलासा' संस्थेने हे साहित्य विद्यार्थाना लवकरात लवकरात लवकर मिळावे यासाठी धडपड करणारे रायगड जिल्हा महागाव तळाचे केंद्रप्रमुख हिलाल सोनावने आणि त्यांचे सहकारी शिक्षक योगेश दांडेकर, गजानन साबळे यांच्याकडे सुपूर्द केले. 
या साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच वाशी महागाव शाळेत पार पडला. यावेळी महागाव केन्द्रातील कोरखंडे बारपे, महागाव आदिवासीवाडी, बहुलेवाडी, विनवली-सालशेत, वाशीमहागाव आदिवासीवाडी या आणि इतर शाळा अश्या ९ शाळांतील १५०  शाळेतील विद्यार्थ्यांना  मोफत वह्या कंपास,पेन, अश्या शैक्षणिक साहित्याचे वाटप एक दिलासा सामाजिक संस्थेचे सल्लागार आणि बोरघर गावातील ज्येष्ठ नागरिक  राम शेलार  यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती मँडम अक्षराताई कदम  युवा अध्यक्ष सचिन कदम गटविकास अधिकारी यादव , गटशिक्षणाधिकारी सोंडकर , बीटविस्तार अधिकारी  खताळ, यांचे उपस्थिती वाटप करण्यात आले. शाळेसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या टिटवाळा तसेच ठाणे-मुंबई येथील सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांचे शाळांच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील एक दिलासा संस्था आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वच संस्था आणि दानशूर व्यक्ती विशेष करून टिटवाळाकरांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक जगदीश कासे , दिलीप पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. 

================================================

Post a Comment

Previous Post Next Post