जीवनदीप कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी दुबई येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत मिळविले घवघवीत यश,
सुस्मिता देशमुख ला सुवर्ण तर दर्शन मोरे ला कांस्य पदक
(टिटवाळा :मुंबई डेटलाईन 24 टिम )
गोवेली ता कल्याण या महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुस्मिता देशमुख व दर्शन मोरे या विद्यार्थ्यांनी दुबई यथे सुरू असलेल्या आशियाई बेंचप्रेस स्पर्धेत घवघवीत यश मिळवून भारत देशासह आपल्या कल्याण तालुक्याचे नाव लौकीक केले आहे,
सुस्मिता देशमुख हिने 47 किलो वजणी गटात 60 किलो ब्रेच प्रेस करून सुवर्णपदक पटकावले, तर दर्शन मोरे यांनी 120 किलो वजन गटात कांस्य पदक पटकावले आहे, सुस्मिता देशमुख हिने महिला गटांतील स्ट्रॉंग उमन चा ही किताब पटकावला आहे,
हे दोन्ही विध्यार्थी ग्रामीण भागातील गरीब कुटूबातील असून त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत जीवनदीप शैक्षणिक संस्थेसह समाजातील अनेक दानशूर वेक्तीनी मदतीचा हात दिला होता , यशस्वी विद्यारथाचे संस्थेचे आद्यक्ष रवींद्र घोडवीदे, प्राचार्य डॉ के बी कोरे यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment