रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया मांडा टिटवाळा शहरातर्फे  कार्यकर्ता मार्गदर्शक  मेळावा संपन्न 



 टिटवाळा : दि.३ ऑक्टोबर २०१८ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंञी रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचा ६१  वा वर्धापन  दिन साजरा होणार असून कार्यक्रमाची  पुर्व तयारीसाठी  पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  सुरेश सांवत यांचे प्रमुख मागदर्शनाखाली आंबेडकरनगर मांडा टिटवाळा येथे  दि. २३/९/१८ रोजी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बहुसंख्येने मुस्लिम समाज बांधव, महिला भगिनी आणि तरुणांनी रिपाई  A पक्षात जाहीर  प्रवेश केला. यावेळी त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले. या मेळाव्यात  ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळाराम गायकवाड , ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, कल्याण तालुकाध्यक्ष विश्वनाथ जाधव, कल्याण जिल्हा महासचिव रमेश बर्वे, इरशादभाई  शेख, गुलामभाई, कवीमित्र गरूड सर, इत्यादींची भाषणे झाली.
मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती  म्हणून दशरथ गायकवाड, स्वप्नील कांबळे , नाना पवार, कल्याण तालुक्यातील पदाधिकारी रमेश भालेराव, हिरामण घनघाव, सिद्धार्थ जाधव (बनेली )महेंद्र जाधव, श्याम जाधव, बंडू भोईर (राया)सुधाकर सोष्टे,रमेश भोईर, सिकंदरसुभाष गायकवाड, मिलिंद अहिरे (युवक अध्यक्ष मुरबाड), रविंद्र पाठारे आदी मान्यवर उपस्थित होती.  
मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर. मांडा टिटवाळा युवक अध्यक्ष सनी जाधव, ठाणे जिल्हा ग्रामीण चे सचिव हरिष कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिष कांबळे यांनी केले  व आभार स्वागत विजय भोईर , सनी जाधव यांनी केले.

 या मेळाव्यासाठी मुरबाड.रायेनिंबवली,सांगोडा, मांडा  टिटवाळा, आंबीवली, अटाळी, बनेली, ऊंभर्णीतुन मोठ्या संख्येने  मान्यवर पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post