मुंबईमधील बालसुधारगृहात
गणेशोत्सवानिमित्त टिटवाळयातील गंधर्व कलाधाराने सादर केला कलाविष्कार
(
टीम )
टिटवाळा येथील कलाकारांनी सामाजिक बांधिलकी जपत डोंगरी, सॅण्डसरोड,डोंगरी,मुंबई बालगृह/सुधार
गृह, येथे गाण्याच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. समाजापासून दूर असणाऱ्या ४०० मुला , मुलींनी व या मुलांची
काळजी घेणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. विशेष
करून तेथील मुला व मुलींनी स्वतःहुन विविध कलाविष्कार दाखवून सर्वांची वाहवा
मिळवली.
सदर गाण्याच्या
कार्यक्रमात उज्वल धनगर यांच्या निवेदनाने मुलांमध्ये उत्साह निर्माण केला.तर गायक
कलाकार शरदजी इंगळे, किरण कांबळे,
आरोही कदम,नॅन्सी यांनी
मुलांना व कर्मचारी यांना गाण्याच्या ठेकावर नाचायला भाग पाडले.गाण्याचा
कार्यक्रम संपल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर असणारे आनंदाचे भाव व पुन्हा परत
गाण्याचा कार्यक्रम देण्यासाठी घातलेली गळ विसरण्यासारखी नव्हती अश्या भावना
यावेळी गंधर्व कालाधाराचे प्रमोद नांदगावकर यांसह कलाकारांनी व्यक्त केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल सुधार केंद्राचे कुलकर्णी सर, चंदर व गंधर्व चे
अतुल शिंपी,ओंकार उबाळे यांनी अथक परिश्रम घेतले.
Khup Sundar ase kam kele ahe pramod ji and team ......very much proud for such social work.
ReplyDeleteAse kamm karat raha.jai hind.
Post a Comment