ठाण्यात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुणे कराराचा जोरदार निषेध !!!

(मुंबई डेटलाईन 24 : ठाणे/प्रतिनिधी-चंद्रकात सोनवणे)


सन १९३२ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेल्या पुणे कराराचा धिक्कार करत काल संपूर्ण देशभरात ५५० जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या ताकदीनिशी पार पडला.
     देश भरातील ५५० जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुणे कराराचा निषेध करत, पुणे कारारातून निर्माण झालेल्या स्वार्थीवृत्तीचा वक्त्यांनी आपल्या क्रांतिकारी शैलीत  चांगलाच समाचार घेतला. याच अनुषंगाने सोमवार दि. २४  सप्टेंबर २०१८ दुपारी २:००ते ४:३० वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रतिकामाई शरद वायदंडे (अध्यक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव कमिटी ठाणे) यांनी केले. त्यांनी उदघाटनपर भाषण करताना पुणे कराराचा जोरदार निषेध करत, पुणे करार धिक्कार दिवस’ आम्ही का आणि कशासाठी करत आहोत हे मोजक्याच शब्दात सांगून एकदिवसीय विशाल धारणा प्रदर्शनाला समर्थन दिले. कार्यक्रमाची अध्यक्षता ऍड. सुमिताताई  पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्षा बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम मोठ्या उस्तहात पार पडला. ऍड.सुमित पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की, आम्ही ज्या आमदार, खासदार यांना निवडून संसदेत पाठवतो, परंतु ते समाजाच्या हिताचे कुठलेही निर्णय घेत नाही. किंवा बहुजन समाजाच्या समस्यांवरती आवाज उचलत नाही.तर ते काँग्रेस, बीजेपी, माकप, भाकप, आणि तृणामुल काँग्रेस या तीन टक्के  ब्राम्हणाच्या राष्ट्रीय पार्ट्याच्या समोर फक्त शेपूट हलवतात. हा जर कशाचा परिणाम असेल तर तो पुणे कराराचा परिणाम आहे. डॉ.बाबासाहेबांनी बहुजन समाजाला जे हक्क अधिकार मोठया कष्टाने मिळवून दिले  होते.ते मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाने २४सप्टेंबर १९३२ ला पुणे येथील येरवडा जेल मध्ये उपोषण करून मिळवलेले अधिकार धुळीस मिळविले.त्याच पुणे कारारातून संसदेत बहुजन समाजाच्या समस्यांनवर न बोलणाऱ्या ना(लायक) दलालांची xxx  पैदास झाली आहे.असा घणाघाती शाब्दिक वार करत खरपूस समाचार घेतला. तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा मीनाताई जाधव यांनी २०१९ च्या निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टी शत्रू पक्षाच्या पार्ट्याना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी जमलेल्या समुदायाला दिला.यावेळी सुरेश जगताप (अध्यक्ष बीएमपी उल्हासनगर तालुका) भाग्यश्री बोराडे, करुणा मोकळ, साक्षी प्रभुलकर, बोराडे सर, अन्सारी साहेब, अफजल खान (उपाध्यक्ष बीएमपी ठाणे जिल्हा) संतोष केदारे, विनोद इंगळे (युवा अध्यक्ष बीएमपी नवी मुंबई)आदींची भाषणे झाली.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश येलवे (अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा) बालाजी मसुरे, रामनारायण जैसस्वार, के. जी. कांबळे, अमोल कासले, ठाणे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एकनाथ जाधव यांनी केले.शेवटी पुणे कराराच्या धिक्काराचे निवेदन ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post