केंद्रशासनाचे  अनुसंधान राष्ट्रीय पोषण अभियान मुंबईतील विक्रोळी येथे संपन्न 
टिटवाळयातील कलाकार आणि शासकीय  कर्मचारी राजेंद्र सावंत यांनी  
आपल्या कलेतून  केला अभियानाचा जागर... 
मुंबई : विक्रोळी ( मुंबई डेटलाईन 24 टिम ) केंद्र शासनाचे  अनुसंधान राष्ट्रीय पोषण अभियान मुंबईच्या  विक्रोळी परिसरात  राबविण्यात आले. एका रॅलीच्या माध्यमातून सकस आहार, स्वच्छता अभियान,बेटी बचाव इत्यादी विषयांवर घोषणांच्या तसेच लोककलेच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रबोधन करण्यात आले. या अभियानात २०० अंगणवाडी शिक्षिका,मदतनीस महिला वर्गांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी काढण्यात आलेल्या  रॅलीत मान्यवरांनी बाबसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सकाळी ठीक ११ वाजता सुरुवात झाली. सदर रॅलीत विक्रोळी भागातील नगरसेविका मनीषा राहटे, नगरसेवक उपेंद्र सावंत,मनसेचे जयंत दांडेकर तसेच पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.या अभियानात टिटवाळा येथील हरहुन्नरी कलावंत आणि   शासकीय कर्मचारी असलेले राजेंद्र सावंत यांनी  या प्रभातफेरीत आपल्या अभिनयकौशल्यातून या रॅलीचे महत्व पटून दिले.त्यांनी लोककलेच्या माध्यमातून केलेल्या प्रबोधनाने हे अभियान अधिक प्रभावी ठरले. 

Post a Comment

Previous Post Next Post