परतीच्या पावसामुळे घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली
डोंबिवली :- (मुंबई डेटलाईन 24 डोंबिवली ब्यूरो चीफ - शंकर जाधव)
डोंबिवली परिसरात गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक जोरदार वारे वाहू लागले,वीजांचा कडकडाट होऊ लागला व परतीच्या पावसाला प्रारंभ झाला.अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे डोंबिवलीकरांची घरी जाताना त्रेधातिरपीट उडाली डोंबिवली निवासी भागात तर सुमारे २० झाडे उन्मळून पडली, अनेक घरांचे पत्रे उडाले यामुळे काही गाडयांवर झाडे पडल्याने सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज शिवसेनेचे कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त केला.
पावसाच्या रौद्र रुपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.मिलापनगर येथील काही बंगल्यांवरचे पत्रे उडाले,येथील ग्रिन्स शाच्या बसच्याकाचा तुटल्या,गच्चीवरील पत्रे उडाल्याने शाळेचे नुकसान झाले जोरदार वारे व मुसळधार पाऊस यामुळे नागरिक घरी परतत असताना झाडे पडल्याने नागरिक थोडक्यात बचावले त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच नागरिकांना रहावेेे लागले. अग्निशमन दलाचे जवान रस्त्याच्या मध्ये पडलेली झाडे उचलण्यासाठी प्रयत्न करत होते सुमारे एक तासानंतर पावसाने विश्रांती घेतली.
Post a Comment