तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर मोकाट कुत्र्यांना पालिकेत सोडण्याचा टिटवाळ्याकरांचा ईशारा..
टिटवाळाकरांनी दिले आयुक्तांना निवेदन
टिटवाळ्यात मोकाट कुत्रांचा उच्छाद
टिटवाळा:- टिटवाळा शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असुन या कुत्र्यांनी येथील शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व महिला- पुरुषांच्या अंगावर हल्ला करून त्यांना चावा घेण्याच्या आणि जखमी करण्याच्या घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे . मात्र वारंवार तक्रारी करूनही या बाबींकडे पालिका प्रशासना जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी सद्यस्थितीत शेकडो मोकाट कुत्री टोळक्या टोक्यांनी फिरताना दिसत आहेत. ही मोकाट कुत्री शालेय विद्यार्थी, जेष्ट नागरी, महीला- पुरुष यांच्या अंगावर धावणे, चवा घेणे तसेच हातातील भाजी व सामानाच्या पिशव्या घेऊन पळणे असा प्रकार रोज मांडा-टिटवाळा येथे कुठे तरी घडत असल्याचे समजते. रेल्वे स्थानक, गणपती मंदिर, शाळा परिसर, रुग्णालय मुख्य रस्ते, तसेच सोसायट्यांच्या परिसरात व कचरा कुंड्याच्या लगत 10 ते 15 च्या टोळक्यांनी ही मोकाट कुत्री टिटवाळा शहरात दिसून येत आहेत. टिटवाळा शहरात सध्या हजारो मोकाट कुत्री फिरतानां दिसतात. या बाबत येथील नागतिकातून वारंवार तक्रारी करून देखील देखील पालिका प्रशासनाचे संबधित विभाग या बाबीकडे सर्रासपणे कानाडोळा करत असल्याचा सूर येथून निघत आहे.
या बाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांना विजय देशेकर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका अध्यक्ष यांनी निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केली आहे. टिटवाळा शहरात हजारो मोकाट कुत्री फिरत आहेत. यांनी आता पर्यंत अनेकांना चावण्याच्या घटना घडल्या आहेत. करदाते नागरीक आपल्या महापालिकेचे विविध प्रकारचे कर नियमीत भरत असुन देखील त्यांना मुलभुत सुविधा पुरविण्यास क.डो.म.पा प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कुत्रा चावण्याच्या आणि हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत असुन देखील कोणत्याहि प्रकारची दखल वा उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. घटना घडली की आपल्या प्रशासना कडुन दिखाव्यापुरती कुत्रे पकडण्याची कारवाई एखाद दुसर्या दिवशी करण्यात येते. गाडीवर असलेल्या कर्मचार्यांना विचारल्यावर त्यांनी आम्हाला फक्त दिवसाला ३० कुत्रे पकडण्याचे आदेश आहेत त्यामुळे आम्ही जास्त कुत्रे पकडू शकत नाही असे उत्तर दिले जात आहे. या समस्येवर तात्काळ तोडगा काढत महापालिकेच्या करदात्या नागरीकांना दिलासा द्यावा.अन्यथा आम्हाला हेच भटके कुत्रे महापालिकेत सोडुन आंदोलन करायला लागेल, असा ईशारा त्यांनी आपल्या निवेदनातुन दिला आहे .
Post a Comment