डोंबिवलीत मिळणार २० रुपयात ' आपलं जेवण '...
कष्टकऱ्यांमध्ये आनंद ..
डोंबिवली : ( मुंबई डेटलाईन 24 - शंकर जाधव)
महागाईच्या काळात कमी पैशात जेवण मिळणार दुर्मिळ झाले असले तरी डोंबिवलीत मात्र चक्क २० रुपयात ' आपलं जेवण' मिळणार आहे.दिवसभर काबाडकष्ट करणा-या रिक्षाचालक, नाका कामगार आणि गरिबांना याचा लाभ घेता येणार आहे. लाल बावटा रिक्षा युनियन व प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्टच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आपलं जेवण चे उदघाटन कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर विनिता राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महापौरांनी जेवणाची पहिली थाली रिक्षा चालकास दिली. पहिल्या दिवशी मोफत जेवणाची थाली देण्यात आली.
या उदघाटनप्रसंगी विरोधी पक्षनेता मंदार हळबे, बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, भारतय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई चे सरचिटणीस प्रकाश रेड्डी, लाल बावटा रिक्षा युनियनचे काळू कोमास्कर, महाराष्ट रिक्षा चालक सेनेचे संजय मांजरेकर, भाजप प्रणित रिक्षायुनियनचे दत्ता माळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शहिद भगतसिंह यांच्या जयंती निमित्ताने डोंबीवली पुर्व भागातील स्टेशन जवल लाल बावटा रिक्षा युनियनच्या वतीने आपलं जेवण ही अवघ्या वीस रुपयात मिलणारी थाली सुरु करण्यात आली.पहिल्या दिवसाचे जेवण बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर आणि रिक्षा सेना कार्याध्यक्ष संजय मांजरेकर यांनी प्रायोजित केले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश बनसोडे यांनी केले. अनिल कढाले, जोत्सना रोकडे, शीतल यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
Post a Comment