मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत गरीब रुग्णांना फळे वाटप...
(मुंबई डेटलाईन 24डोंबिवली ब्युरो चिफ-शंकर जाधव)
डोंबिवली : मनसे नेते राजु पाटील यांचा वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत माजी उपविभागीय अध्यक्ष संदीप ( रमा ) म्हात्रे यांच्यावतीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गरीब रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, संजीव ताम्हाणे, विभाग अध्यक्ष वेद पांडे, विजय शिंदे, उपविभाग अध्यक्ष विशाल बढे,शाखा अध्यक्ष प्रकाश थोरात, जेरी फ्रान्सिस, अजय शेट्टी, विकी चौधरी, संजय म्हात्रे, वर्गेस पाटील, अंकुश पाटील, विन्सेंट कुट्टी,विलास म्हात्रे, सौरभ हाटे,समीर चाळके, आकाश पेट्रो,प्रवीण शेट्टी आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण - डोंबिवली महापालिकेचे मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत विशेष मुलांचे संगोपन करणा-या अस्तित्व संस्थेतील मुलांकरीता फळांचे वाटप केले.अनाथांचे पालन पोषण करणा-या जननी आशिष संस्थेत फले वाटण्यात आली.शास्त्री नगर हाँस्पिटल येथील रुग्णांना व विष्णु नगर पोलिसांना फळांचे वाटप करण्यात आले.
Post a Comment