कल्याणात खळबळ.......
डीसीपी आणि प्रांत रिक्षात जिलेटीनच्या कांड्या
डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरात एका इमारती मध्ये मध्ये तळमजल्यावर डीसीपी कार्यलय ,पहिल्या मजल्यावर निवडणूक ,दुसर्या मजल्यावर प्रांत कार्यालय आहे .अशा तीन महत्वाहे शासकीय कार्यलय असलेल्या या इमारतीच्या परिसरात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली होती .या रिक्षा मध्ये अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावामध्ये राहणाऱ्या ती शेतकरी महिला आपल्या कामानिमित्त प्रांत कार्यालयात आल्या होत्या. खडकपाडा पोलिसांनी स्फोटके जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे सबंधित महिलांचा जमिनीचा वाद सुरु असल्याने कट रचून महिला आणि रिक्षा चालकाला फसविण्यासाठी हे विस्फोटक ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
डीसीपी कार्यलयसमोर पोलीस कर्मचार्याला एक चिठ्ठी मिळाली एका रिक्षात स्फोटक ठेवण्यात आले आहे .पोलिसांनी याची गंभीर दखल घेत रिक्षाचा शोध सुरु केला . पोलिसांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथक पाचारण केले तत्काळ बॉम्ब शोधक पथक घटना स्थळी पोहचले एका रिक्षा मध्ये चार डीटोनेटर व दोन जिलेटीन च्या कांड्या आढळून आले. या रिक्षातून अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावातील तीन शेतकरी महिला प्रांत कार्यलयात आल्या होत्या .या महिलांच्या नावावर असलेल्या जमिनीचे प्रकरण प्रांत कार्यलयात सुरु आहे .सदर रिक्षा चालक हि वसाद गावात राहतो या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केलि आहे .या तीन महिला आणि रिक्षा चालकाला फसविण्यासाठी हे विस्फोटक ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरु केला आहे .
Post a Comment