टिटवाळा
पोलिस स्थानकात आदिवासी सामाजिक फाउंडेशन आणि आदिवासी ‘नोकर वर्ग
ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था संस्था’ यांच्यावतीने कवी दिनकर मनवर विरोधात
गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन .
टिटवाळा : ( मुंबई डेटलाईन 24 टिम ) : दृश्य नसलेल्या दृश्यात या कवी दिनकर मनवर याच्या काव्यसंग्रहात आदिवासी अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग
करणारी कविता लिहिली असून मुंबई विद्यापीठाने ती कविता बीए च्या तिसऱ्या वर्षाच्या
अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचे पडसाद
सर्वत्र उमटताना दिसत असून ठीक-ठिकाणी याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. कवी
दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ ठाणे, पालघर,रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील
कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच अनुषंगाने ‘आदिवासी
सामाजिक फाउंडेशन’ आणि ‘आदिवासी नोकर वर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था’ यांच्यावतीने टिटवाळा पोलीस स्थानकात कवि दिनकर
याच्या पुस्तकावर बंदी आणून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी टिटवाळा
येथील समस्त आदिवासी बांधवानी एकत्र येत निवेदन दिले आहे. यावेळी टिटवाळा येथील
आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पाणी कसं अस्तं’ या शिर्षकाखाली मुंबई
विद्यापीठाच्या बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात प्रकाशित केलेल्या कवितेत
आदिवासी मुलींची मानहानी करणारे ,विनयभंग
करणारे वर्णन आहे. या कवितेमुळे समाजात विशेषतः महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त
होत असून या प्रकरणाची गंभीर आणि तातडीने
दखल घ्यावी यासाठी ‘आदिवासी
सामाजिक फाउंडेशन’ आणि ‘आदिवासी नोकर वर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था’ उद्या देखील पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येने
उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment