काँग्रेसचे माजी
नगरसेवक सदाशिव शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त
आरोग्य शिबिर
संपन्न....
अनेक नागरिकांनी
घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
डोंबिवली :-( शंकर
जाधव )
काँग्रेसचे माजी
नगरसेवक सदाशिव शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरा नगर येथे भरविण्यात आलेल्या
आरोग्य शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. अनेक राजकीय पदाधिकारी आणि विविध
क्षेत्रातील मान्यवरांनी सदाशिव शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिराचे उदघाटन सदाशिव शेलार यांनी केले.
उदघाटन समयी युवा कार्यकर्ते अजय शेलार, काँग्रेसचे
कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.अमर ज्योती प्रतिष्ठान व
हेल्थकेअर व सत्यसाई प्लँटिनम हाँस्पीटल यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांच्या
सोयीसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्रचिकित्सा, मधुमेह, बीएम आय, बाँडी फिटनेस, आहार सल्ला, रक्तदाब , नाडीपरिक्षण, मोतीबिंदू, ईसीजी, दंतचिकित्सा मशिन द्वारे
रक्ततपासणी इत्यादी तपासण्या विविध तज्ञ डाँक्टरद्वारे करण्यात आले.प्रभागातील
नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
Post a Comment