पाच रुपयांच्या वादातून एसटी कंडक्टरला प्रवाशांची मारहाण
डोंबिवली :- ( शंकर जाधव) सुट्ट्या पैशांवरुन झालेल्या वादातून प्रवाशांनी एसटी कंडकटरला मारहाण केल्याची घटना कल्याणात घडली .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. तक्रारी नुसार पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा
दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण एसटी डेपो हून कल्याण मुरबाड हि एसटी निघाली .एसटी पौर्णिमा चौकी येथे पोचताच कंडकटर नितीन खंडागळे याच्यासोबत दोन प्रवाशांनी अवघ्या पाच रुपये सुट्टे नसल्याने खंडागळे यांना शिवीगाळ करत वाद घालन्यास सुरुवात केली.या दोन प्रवाशांनी खंडागळे यांना मारहाण केली घडलेला प्रकार पाहून एसटी चालकाणे बस थेट जवळच असलेल्या महात्मा फुले पोलीस स्थानकात नेली.खंडागळे यांनी या घडल्या प्रकाराबाबत पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दोन प्रवाश्यांविरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Post a Comment