रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या मेळाव्यासाठी डोंबिवलीतून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते रवाना...
(डोंबिवली : - ब्यूरो चिफ -शंकर जाधव)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाचा ६१ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.शेलार नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डोंबिवलीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते ठाणे येथे रवाना झाले. रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली किशोर मगरे, दिनेश साळवे, वसंत टेकाळे दिलीप काकडे, तुकाराम पवार, समाधान तायडे, विठ्ठल खेडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.
Post a Comment