खडवली ग्रामपंचायत अंतर्गतसाईबाबा मंदिर ते कोळीवाडारस्त्याच्या कामाचा उद्दघाटन कार्यक्रम संपन्न
टिटवाळा : ग्रामपंचायत निवडणूकीत वाॅर्ड क्रमाक १ मधून निवडणूक लढवलेल्या सौ. सायली संजय पारेकर यांनी कोळीवाडा (कोळी टेप) खडवली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्यासाईबाबा मंदिर ते कोळीवाडा हा रस्ता करून देईन असे आश्वासन दिले होते. गेल्या १० वर्षांपासून हा रस्ता झाला नव्हता .यारस्त्याची परिस्थिती फार वाईट झाली होती.निट चालता ही येत नव्हते. हा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत ठक्कर बप्पा या योजनेतूननिधी मंजूर करून घेतला. या रस्त्याचा उदघाटनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यकर्माचे उदघाटन भाजपा नेते अरूण पाटील यांच्या हस्ते झाले.तर वाॅर्ड क्रमांक १ च्या सदस्या सौ. सायली संजय पारेकर यांच्या हस्ते पुजा व भूमीपूजन झाले.या प्रसंगी भाजपा उपजिल्हा प्रमुख मुरलीधर चौधरी जिल्हा पदाधिकारी विलासजी जाधव जेष्ठ कार्यकर्ते रमेश लोणे, सुरेश लोणे, माजी सरपंच कुंडलीक लोणे, संजय पारेकर, कुणाल पवार,मनोज अग्नीहोत्री,इंजिनीयर विशाल भोईर, कॅान्टॅ्क्ट चेतन शेलार, एस् के टेलर, वरकूटे टेलर्ल, बबन भोईर, रमेश शेलार,योगेश सोनावळे, दिपक रोठे,गणेश रोठे,बलन अग्निहोत्री,राम गायकर,शंकर राऊत,मधूरक राऊत,रखमा जगनाडे,सचिन शेलार,महेश भोईर,सनी,चेतन भोईर,सखाराम लांगे,सुनिल राऊत,तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Post a Comment