घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला टिटवाळा रहिवाशांचा विरोध
टिटवाळा:- मांडा पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पास टिटवाळ्यातील रहिवाशांकडुन तीव्र विरोध असुन यामुळे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी याबाबत होणाऱ्या जनसुनावणीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनपा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचार्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी मौजे., मांडा सांगोडा रोड मलशुध्दीकरण केंंन्द्रालगत १५०मे.टन क्षमेतेचे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणेत येणार असुन याबाबत जनसुनावणी दिंनाक१४नोव्हेंबर रोजी दु.१२.००वा. विघामंदीर हायस्कूल मांडा पुर्व येथे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असुन मांडा -टिटवाळा परिसरातील नागरिकाचे दैनंदिन आरोग्य, राहाणीमान संभाव्य नागरी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहता ग्रामस्थांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास तीव्र विरोध वाढत आहे.
मनपाच्या संर्दभित प्रकल्प मांडा गावाच्या पश्चिमेस अंदाजे ३००मीटर इतक्या अंतरावर होणार असुन नागरी वस्ती अंदाजे ५० ते१००मी. इतक्या अंतरावर असल्याने नागरी वस्ती जवळ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सदर परीसर सखोल भाग असल्याने पावसाळ्यात पुरसदूश्य परिस्थिती निर्माण होते. सदर ठिकाण पाण्याखाली जाते. मनपाने उभारलेल्या मलनिस्सारण/सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा संर्दभित ठिकाणापासून अंदाजे९ ते१०मी. इतक्या अंतर असल्याने प्रदुषणात मोठी वाढ होऊन परिसरातील नागरी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे ही बाब नाकारता येत नाही. घनकचरा प्रकल्प ठिकाणापासून पश्चिमेस काळु नदी चा खाडीशी संपर्क होणारे पात्र आहे. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणा मधुश नाला/ओहोळ वाहात आहे. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊ शकते. तसेच सदर ठिकाण हे सी.आर्. झेड. अंतर्गत येत असुन ते काही बाजुनी जल प्रवाहानी वेढलेले आहे. संर्दभित ठिकाणी पुरेसा बफर झोन ठेवलेला नाही. संदर्भीत ठिकाणी च्या पुर्वी ला हिंन्दु स्माशनभुमी असुन सभोवती शेती., मासे मारी,विटभट्या असे पांरपारिक व्यवसाय आहेत. घनकचरा व्यवस्था पन प्रकल्प झाल्यास पारंपरिक व्यवसाय संपुष्टात येऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. टिटवाळा हे महागणपती तिर्थस्थळ व पर्यटन स्थळ असल्याने भाविकांची दर्शनासाठी वर्दळ असते. , मुंबई वडोदरा हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग ह्या परिसरातुन जात असल्याने अवजड वाहानांची मोठी वर्दळ राहणार आहे. वरील सर्व बाबी पाहता जनमताचा आदर करुन मौजे सांगोडा रोड मल शुध्दीकरण क्रेंन्दालगत १५० मे.टन क्षमेतेचे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येऊ अशी आमच्या सर्व मांडा-टिटवाळा रहिवाशी ची मागणी आहे.अशा आशयाचे पत्र क.डो.म.पा.आयुक्तांना उपमहापौर उपेक्षा शक्तीवान भोईर यांनी दिले आहे.
Post a Comment