डोंबिवलीत राज ठाकरे आणि राष्ट्रवादी प्रवक्त्याच्या भेटीमागे नवे राजकीय
समीकरण
डोंबिवली :- दि.१५ ( शंकर जाधव ) आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्षांनी जोरदार
हालचाली सुरु केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष
शरद पवार
यांची कौतुक
केल्याने हे राजकीय गणित इतर राजकीय पक्षांना विचार करण्यास भाग पाडत आहे. शनिवारी
डोंबिवलीतील दोन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आले होते. त्यानंतर पलावा
येथे मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे
यांची भेट घेतली. हि सदिच्छा भेट असली तरी भेटीमागे अनेक राजकीय चर्चेला उधाण आले
आहे.
तीन राज्यात भाजपने सपाटून मार खल्ल्यानंतर
महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पसंतीचा पक्ष बनू शकतो असे आजच्या
भेटीवरून दिसून आले आहे. त्यात राज ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी शरद पवार यांचे
कौतुक केले होते. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष अंतर्गत युती करतील अशी जोरदार
चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच मुंबई, ठाणे,
रायगड,सिंधदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे
वर्चस्व कमी करण्यासाठी मनसे आणि राष्ट्रवादि यांची छुपी युती आणि त्यात
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची कोकणात असलेली ताकद ही या वेगळ्या
अंर्तगत आघाडीला पाठिंबा देणारी ठरेल असे राजकीय समीकरण होईल असे गेल्या
वर्षभरापासून सुरु असलेल्या जुळवाजुळवीवरून दिसून येत आहे.
शनिवारी डोंबिवलीतील सुनील नगर येथील
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या`राजगड`जनसंपर्क कार्यालयाचे आणि आणि विरोधी पक्ष
नेते मंदार हळबे यांच्या राजाजी पथ येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे
यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील याच्या पलाव येथील
कार्यालयाला राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे
यांनी राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमागील उद्देश काय होता याबाबत
तपासे यांना विचारले असता “राज ठाकरे यांच्या भेटीमागे कोणताही उद्देश नसून फक्त
हि सदिच्छा भेट होती” असे सांगितले. मात्र या भेटीमागे शरद पवार यांचा निरोप
पोहोचविण्याचे काम तपासे यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Post a Comment