समाजवादी फाँवर्ड ब्लॉक महाराष्ट्रातील  निवडणूक रिंगणात उतरणार 


डोंबिवली :- दि. १५ ( शंकर जाधव )
     नेताजी  सुभाष चंद्र बोस यांच्या विचारावर आधारलेला समाजवादी  फाँवर्ड ब्लाँक पक्ष तेलंगणात झालेल्या   विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात  उतरला होता. आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीत  उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे महामंत्री तथा प्रदेश अध्यक्ष सतीशराज शिर्के यांनी सांगितले. 
      याबाबत  महामंत्री तथा प्रदेश अध्यक्ष सतीशराज शिर्के म्हणाले कीभ्रष्टाचाराने देश पोखरलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `भ्रष्टाचार मुक्त भारत` करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पुर्तता न झाल्याने मोदींची हार झाली. आम्ही  भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचे कृती मधून दाखवू.फाँवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना १९३९ ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी   केली. देशाची लूट करणा-या  इंग्रज सरकार विरोधात लढण्यासाठी सुभाष बाबूनी या पक्षाची स्थापना केली होती.सुभाष बाबूंच्या प्रेरणेतून आम्ही समाजवादी फाँवर्ड ब्लॉक पक्षाचे काम सुरु केले. भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यासाठी  यंदाच्या तेलंगणात निवडणुका लढविल्या. तेलंगणाच्या ३२ विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात आले होते.भ्रष्टाचार मुक्त सरकारसाठी सुभाष बाबूंच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन तेलंगणाच्या जनतेला केले. जनतेने भरभरून मते दिली. ३२पैकी १६ उमेदवारांना  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार  चौथ्या स्थानावर होते.आता भ्रष्टाचार मुक्त  सरकार निर्मितीसाठी देशात व राज्यात पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत. २०१५ च्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या  निवडणुकीत पक्षाच्या २१उमेदवारानी निवडणूक लढविली होती. ४० पक्षांच्या आघाडीत आमच्या पक्षाचा समावेश होता.बसपा उमेदवार या निवडणुकीत निवडून आला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणूकीत उत्तम प्रतिसाद मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत २५० उमेदवार पक्षाच्या वतीने रिंगणात असतील. येत्या लोकसभा, विधानसभा, पालिका, जिल्हा परिषद, व ग्रामपंचायतीच्या  निवडणुक आखाड्यात उमेदवार उभे करणार असल्याचे  सतिशराज शिर्के यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post