राहुल गांधी यांनी आता पप्पू ऐवेजी लग्न करून
पापा बनायला हवे
रामदास आठवले यांचा राहुल गांधींना
सल्ला
डोंबिवली :- ( शंकर
जाधव ) तीन राज्यात कॉंग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे राहुल गांधीं आता राहुल
गांधी यांनी आता पप्पू ऐवेजी लग्न करून पापा बनायला हवे अश्या शब्दात
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी
यांना सल्ला दिला. त्याचबरोबर आठवले यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीबाबत
बोलताना शिवसेनेने भाजप बरोबर युती कायम ठेवली पाहिजे, अन्यथा
याचा फटका शिवसनेलाच बसेल असेहि यावेळी सांगितले.
रिपाईच्या वतीने कल्याण येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आठवले यांनी तीन राज्यात भाजप
हरली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरले नाहीत. त्यामुळे काठावर पास झालेल्या
कॉंग्रेसने जास्त आनंदी होऊ नये. या तिन्ही राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर
भाजप अधिकच गंभीर विचार करत आहे. असे सांगितले. महाराष्ट्रातील आगामी
निवडणुकांबाबत बोलताना मात्र आठवले यांनी शिवसेनेला सल्ला देण्याची संधी सोडली
नाही. भाजप बरोबर युती अन्यथा शिवसेनेचा भ्रमनिरास होईल असे सांगितले.यावेळी
कॉंग्रेसवर टीका करताना आठवले यांनी केंद्राच्या योजनाबाबत अधिक भाष्य केले. निवडणुकांना जवळ आल्या असून सरकार
पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करणे, शेतकरी आणि
मागासवर्गीयांना कर्ज माफी विविध प्रकारचे टॅक्सस कमी करण्यासारखे लोकोपयोगी
निर्णय घेणार आहे. अंबरनाथ हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आपल्या सुरक्षतेत वाढ केली आहे. त्या
घटनेने आपण डगमगणार नसून आपलं काम असेच सुरु राहील. मंत्री म्हणून आपण समाजाच्या
कोणत्याही कामात कमी पडत नसताना माझ्याच समाजाच्या व्यक्तीने हे
कृत्य का केले त्याचा बोलविता धनी कोण हे शोधणे गरजेचे असून असे हल्ले परतवून
लावण्याची ताकद माझ्यात असल्याचे ते म्हणाले.यावेळी आमदार नरेंद्र
पवार, राष्ट्रीय
सरचिटणीस द्याल बहादुरे,उपाध्यक्ष दीपक निकाळजे, सचिव अण्णा रोकडे, जिल्हा
अध्यक्ष प्रल्हाद जाधव, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष जय जाधव,
डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment