डोंबिवलीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे  स्थानिक कलाकारांना मिळणार व्यासपीठ    
डोंबिवली :- दि. १७ ( प्रतिनिधी- शंकर जाधव ) आज मोठ-मोठ्या कलाकारांना उत्तम संधी मिळते.मात्र स्थानिक कलाकारांना संधी मिळताना खूप अडचणी येतात. अश्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीची संधी डोंबिवलीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीयचित्रपट महोत्सवात मिळणार आहे. या महोत्सवात १०० समकालीन चित्रपटमाहिती पटविविध प्रादेशिक भाषांतील लघुपटांचा उपशिर्षकासह समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक तथा महोत्सवाचे प्रमुख आयोजक जान्हवी मल्टी फाउंडेशनच्या जान्हवी कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.
     यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव प्रेरणा कोल्हेप्रमुख आयोजक तथा दिग्दर्शक जान्हवी कोल्हेमाहिती अधिकारी  रियाज खान उपस्थित होते.यावेळी प्रेरणाकोल्हे म्हणाल्या, फाउंडेशनच्या वतीने ७ जानेवारी ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान डोंबिवलीतील जन गण मन शाळेत पूर्व  प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बालसाहित्य संमेलन,छायाचित्रण स्पर्धा आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डॉ. राजकुमार कोल्हे  यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमच्या निमित्ताने अमेरिकन राजदूत केनेथ जस्टर यांना जे एम एफ ( जान्हवी मल्टी फाउंडेशन ) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले. चित्रपटातील करिअरच्या संधी ह्या मुंबईत  एकवटलेल्या आहेत.सिनेमा उद्योग  त्यांचे विकेंद्रीकरण व्हावे. त्यासाठी हे चित्रपट महोत्सव सकरात्मक भूमिका निभावू शकतात. या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सुसंवाद होईल अशी माहिती प्रमुख आयोजक तथा दिग्दर्शक जान्हवी कोल्हे यांनी दिली.

चौकट
मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रेक्षकांनी साथ दिली पाहिजे...

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांनी मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी आपले मानून चित्रपटगृहाकडे गेले पाहिजेत असे एका कार्यक्रमात सांगितले होते. याबाबत प्रमुख आयोजक तथा दिग्दर्शक जान्हवी कोल्हे यांनी विचारले असता त्या म्हणाल्या, इतर राज्यात त्याच्या भाषेतील चित्रपटांना तेथील प्रेक्षक अक्षरकशा डोक्यावर घेतात. मात्र महाराष्ट्रात असे होताना दिसत नाही. त्यामुळे मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रेक्षकांनी साथ देणे आवश्वक आहे.


Post a Comment

Previous Post Next Post