*कॉंग्रेसच्या निषेधाचा पोलिसांना धसका*...
*प्रदेश प्रतिनिधीला बजावली नोटीस*

डोंबिवली :-  ( शंकर जाधव  ) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार १८ तारखेला कल्याण येथे मेट्रोच्या उद्घाटनासाठी येणार आहे. राफेल प्रकरणात आक्रमक झालेली कॉंग्रेस मोदी यांचा निषेध काळे झेंडे दाखवून करणार असल्याचे प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग यांनी सांगितले होते.यावर सिंग यांना विष्णूनगर पोलीस ठाण्याने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या निषेधाचा पोलिसांनी चांगलाच धसका घेतला आहे.
    उत्तर भारतीय महापंचायत संघाचे अध्यक्ष विनय दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या कल्याण येथे निषेध करणार असल्याचे पोलिसांना समजताच त्यांना अटक करण्यात आली. दुबे  यांनी शपथपत्र देऊन असे कृत्य करणार नाही असे शपथपत्र दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. कॉंग्रेसने राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचप्रमाणे जनतेला दिलेली अनेक आश्वासने पूर्ण करण्यास मोदी सरकार फेल गेल्याचे सांगत कॉंग्रेस प्रतिनिधी नवीन सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्याण येथे काळे दाखवून निषेध करणार असल्याचे सांगितले.यावर विष्णूनगर पोलिसांनी सिंग यांना नोटीस बजावली.आपण स्वतः किंवा आपल्या हस्तकाकरवी कायदा सुव्यवस्थेला बाधा होईल असा  प्रत्यक्ष  प्रकार अथवा घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील व आपणा विरुद्ध भा.दं.वि.कलम १८८ प्रमाणे तसेच प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल  असे या नोटीस मध्ये म्हटले आहे.     


Post a Comment

Previous Post Next Post