अरेरे... `त्या` जखमी
प्रवाश्यांना वेळेवर मदत मिळाली असती तर .......
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) लाखो – करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रवाश्यांचा जीव अगदी कवडीमोलाचा
वाटावा अशी भूमिका रेल्वे प्रशासनाची असल्याचे दिसून येत आहे.डोंबिवली रेल्वे
पोलिसांच्या हद्दीतील डोंबिवली-दिवा-वसई मार्गावरील कोपर, भिंवंडी,बापगाव,
कामण
व जुचंद्र अशा पाच रेल्वे स्थानक आहेत. मात्र या स्थानकाकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करत
असल्याने या स्थानकादरम्यान रेल्वे
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आणण्यासाठी हमाल आणि रुग्णवाहिकेची नसल्याची
वास्तविकता समोर आली आहे. जखमी प्रवाश्यांपर्यत लोहमार्ग पोलिसांना पोहोचण्यास खूप
वेळ लागत असल्याने परिणामी जखमी प्रवासी तडफडून आपले प्राण सोडतात.
डोंबिवली
रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील या पाचहि
रेल्वे स्थानकादरम्यान गेल्या १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर १८
पर्यत १५७ प्रवाशांचा मृत्यु तर ९१ जण जखमी झाल्याची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोपर,भिंवंडी,बापगाव, कामण व जुचंद्र
अशा पाचही रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आणण्यासाठी
हमाल नाहीत वा रुग्णवाहिकेची सेाय नाही.
यामार्गावर मर्यादित ट्रेन धावत असल्याने रात्री अपरात्री एखादा अपघात झाला तर
डोंबिवली रेल्वे पोलीसांना पायपीट करावी लागते. दिवसासुध्दा या मार्गावर तीन चारच ट्रेन असल्याने जखमी प्रवाशांना
आणणे अत्यंत त्रासाचे असते. डोंबिवली लोहमार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी प्रवाशांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांचा जीव वाचला असता. परंतु रेल्वेने या मार्गावर कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. वरिष्ठांना कळवूनही
ते दुर्लक्ष करतात अशी तक्रार रेल्वे
पोलीसांनी केली. एका पोलीसाने
दिलेल्या माहितीनुसार अपघातात जखमी वा मृत प्रवाशाला आणण्यासाठी इतर नागरिकांची
मदत घेण्याचा प्रयत्न केला तर ते तयार होत नाहीत त्या नागरिकाना विनवणी करुन
बोलवावे लागते. अगदीच कोणी
तयार झाले नाही तर नाका कामगार आणावे लागतात पण ते पाचशे रुपयांपेक्षा कमी पैसे घेण्यास तयार होत नाही आणि रेल्वे आम्हाला केवळ १०० रुपये यासाठी मंजूर करते याकडे
त्यानी लक्ष वेधले.'दिवा वसई मार्गावर जखमी वा मृत प्रवाश्यांचा मृतदेह आणण्यासाठी रेल्वे पोलिसांना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागत असून वरिष्ठाना वारंवार या
त्रुटीसंदर्भात कळवण्यात आले आहे. याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जखमी वा मृत प्रवाशांना आणणे रेल्वे प्रवाश्यांना आमच्या कर्मचार्याना
खूपच त्रासाचे असल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वपोनी
सतीश पवार यांनी सांगितले.
Post a Comment