संजय घरत यांच्यावरील  दोषारोप दाखल होऊ  नये म्हणून राजकीय दबाव ?
डोंबिवली  ( शंकर जाधव  ) कल्याण डोंबिवली महापालिकेचे निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाचलुचपत खात्याने १३ जून १८ रोजी  पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. मात्र सहा महिने होऊनही अजून कोर्टात दोषारोप दाखल करण्यात आला नाही. पोलीसांनी १००० हजार पानांचे आरोपपत्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांकडे महिन्यापूर्वीच पाठवले आहे. पण अजून आयुक्त गोविंद बोडके त्याचे वर सही करण्यास तयार नाही. त्यांच्यावर  भाजपाचा राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.


  लाच लुचपत प्रितबंधक विभागाने संजय घरत यंाचेसह भूषण पाटील,ललित आंब्रे व समीर पाटील यंानाही अटक केली आहे अतिरिक्त आयुक्ताना येत्या निवडणूकीपूर्वी पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेत रुजू करुन घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून यामुळेच  आयुक्त सही करण्यास तयार नाही. आयुक्त जर भाजपाच्या दबावामुळे सही करत नसतील तर त्यानी महासभेपुढे हा विषय आणावा अशी मागगणी आता पुढे येत आहे. मात्र राज्य शासनाने २०११मध्ये कायद्यामध्ये सुधारणा केली असून त्यानुसार पोलीस वा कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांंना दिला असून नंतर त्यांनी यां सदर्भात अहवाल सभेत ठेवावा अशी सुधारणा करण्यात आली आहे याबाबत आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी  संपर्क होूऊ शकला नाही .मात्र खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भााजपा आयुक्तांनी अहवाल फेटाळून लावावा म्हणून दबाव आणत आहेत. मात्र आयुक्त असे करण्याची शक्यता नाही कारण असे केले तर आयुक्त बोडके कमालीचे अडचणीत येण्याची शवयता आहे. खास सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त लवकरच सही करण्याची शक्यता आहे.मात्र आता ते कधी सही करतात हे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post