आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल   ऍपचे वाटप 
 डोंबिवली : ( शंकर जाधव  ) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील पडलेशिळदिवा येथील शाळांमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थांना परीक्षेच्या तयारीकरिता त्याचप्रमाणे अभ्यास सोप्या पद्धतीने करण्याकरिता मोफत मोबाईल  एॅपचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेतेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी तसेच अभ्यासाच्या दृष्टीकोनातून दहावीचे कठीण वर्ष सोपे जाण्यासाठी आयडियल मार्फत तयार करण्यात आलेले अद्ययावत स्वरूपाचे आयडियल १० हेमोबाईल   ऍप  विद्यार्थ्यांना देण्यात आले. 


           कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सरस्वती विद्यालयपडले गाव येथील दहावीचे १३१ विद्यार्थीशिळ गावातील हाशा रामा पाटील विद्यालयातील १४८ विद्यार्थीगणेश विद्या मंदिरदिवा येथील  २५५ विद्यार्थी व इंग्रजी माध्यम ५० विद्यार्थीएसएमजी विद्यालय दिवा ३७० विद्यार्थी तसेच दिवा हायस्कूल मधील १७० विद्यार्थी अशा तब्बल ११२४ दहावीच्या विद्यार्थ्यांना या आयडियल १० मोबाईल   ऍप    चा लाभ देण्यात आला.या मोबाईल ऍपमध्ये बोर्डाच्या परीक्षेत बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण तयारीपाठ्यपुस्तक वाचून झाल्यावर आकलनासाठी व उजळणीसाठी उपयुक्त नोट्सभाषा विषयांसाठी बेसिक व्याकरणसहित मार्गदर्शनप्रत्येक धड्याचे महत्वाचे मुद्देसूत्रेसनावळीप्रश्नोत्तरे यांचा समावेश जास्तीत जास्त मार्क मिळण्याची टिप्सबदललेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूपविद्यार्थ्यांचे समुपदेशन व करियर मार्गदर्शन अशा विविधांगी स्वरूपाने बनविण्यात आलेल्या मोबाईल  ऍप  चे वाटप आज मोफत आमदार सुभाष भोईर यांनी केले.यावेळी दिवा हायस्कुलचे संस्थापक गोवर्धनदादा भगतठाणे उपशहर प्रमुख ब्रम्हाशेठ पाटीलडोंबिवली उपशहर प्रमुख अभिजित थरवळविभाग प्रमुख अरुण म्हात्रेउमेश भगतयुवसेना युवा अधिकारी सुमित सुभाष भोईरशाखाप्रमुख दिलीप पाटीलवैकुंठ म्हात्रेश्याम काठेसुनील अलीमकरएसएमजी शाळेचे अध्यक्ष स्वप्नील मारुती गायकरयुवासेनेचे अभिषेक ठाकूर आशिष शिंदेआकाश म्हात्रेमोरेश्वर अलिमकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post