विज्ञान संमेलनात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे घनकचरा व्यवस्थापनवरील प्रयोग लक्षवेधी... 
 डोंबिवली : ( शंकर जाधव )


विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची रुची वाढावी आणि कल्पक प्रयोगाचे प्रदर्शन त्याच्या हातून घडावे, विद्यार्थ्याची कुतूहल बुद्धी जागरूक वाढावी म्हणून डोंबिवलीतील स.वा.जोशी विद्यासंकुलात दोन दिवसीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात शालेय विद्यार्थ्यांनी नाविन्य आणि कल्पक प्रगोय सादर केले. दैनदिन जीवनात उपयोगी पडतील असे प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून सादर केले. यावेळी नागरिक, शिक्षकवर्ग आणी विद्यार्थ्यांनी या संमेलनात प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. या संमेलनात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यानी घनकचरा व्यवस्थापनावर सादर केलेल्या प्रदर्शनात प्रयोगाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
      कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक विद्यालयातील शिक्षक मयूर मावकर यांच्यासह संकेत नाडेकर आणि विशाल नागवाडिया या विद्यार्थ्यांनी अग्निरोधक प्रकल्प सादर केला. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र.१८ मधील विद्यार्थी भूमिका तायडे आणि सिमरन मराठे यांनी`स्मार्ट डसबिन`प्रकल्प सर्व महानगरपालिकेसाठी विचार करण्यासारखा होता.कचराकुंडी काटोकाट भरल्यानंतर त्याबाबतचे संकेत सेन्सरद्वारे पालिका कार्यालयात मिळतील अशी सोय कचराडब्यात केली असल्याचा प्रयोग केला होता. नॅशनल उर्दू स्कूल कल्याण येथील विद्यार्थ्यानीही अशा प्रकारचा प्रयोग सादर केला होता. डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव ठाकुर्ली येथील लोकमान्य टिळकप्राथमिक विद्यालयातील शिक्षिक लक्ष्मन वेड्गा आणि राहुल गोटे व प्रीतम लोखंडे यांनी`कारखान्यातून निघणाऱ्या पाण्याचे पुनर्वापर`हा प्रकल्प संमेलनात सादर केला. कारखान्यातून निघणारे अशुद्ध पाणी टप्पाटप्पातून शुद्ध होऊन ते पाणी आजुबाजुलाच्या शेतीला आणि घरांसाठी वापरता येईल. या संमेलनात भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, संचालित एकलव्य विद्या संकुल, यमगरवाडी ( ता.तुळजापूर, जिल्हा- उस्मानाबाद ) यांनी रेमो कारचा अपघात झाल्यास त्यातील प्रवाश्यांना इजा होणार नाही अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे.मोहने येथील एनआरसी शाळेतील शिक्षक प्रेरणा केदार आणि अनुषा काळे व धीरज जांवूरकर या विद्यार्थ्यांनी `खेळातून गणिताची भीती दूर करण्यासाठी `गणितीय प्रतिकृती`प्रयोग सादर केला.   
 मतदान प्रक्रिया कमी वेळात होण्यासाठी सुभेदार वाडा हायस्कूलचा `ऑनलाईन सेटराईज वोटिंग सिस्टम`प्रयोग... 
     कल्याण येथील सुभेदार वाडा हायस्कूल मधील पारस सातपुते या विद्यार्थ्याने मतदान प्रक्रियेत वेळ वाचवा म्हणून यावी यासाठी `ऑनलाईन सेटराईज वोटिंग सिस्टम`प्रयोग सादर केला.याच्या सहायाने मतदान कमी व्यक्तीच्या मदतीने कमी वेळात होऊ शकते.यामध्ये मतदान केंद्रातील संगणकावर हे सोफटवेअर इनस्टोल करून हे सर्व संगणक नेटवर्क पद्धतीने एकमेकांना जोडले जातील.सुरक्षेच्या दृष्टीने सर्व संगणक मुख्य सर्व्हरच्या सहाय्याने  स्कॅन केले  जातील.त्यामुळे जोडलेल्या संगणकातील त्रुटी व मतदानास बाधा आणणारे प्रोगाम काढून टाकले जातील.

Post a Comment

Previous Post Next Post