टिटवाळा परिसरात दोन दिवसांपासून झालेल्या पावासाने नागरिक हाल –बेहाल
वासुन्द्री आणि रूंदा पूल अजूनही पाण्याखालीच
विजपुरवठा खंडित असल्याने अनेक गावे अंधारात... तर पिण्याच्या पाण्याचेही हाल
टिटवाळा : ( अजय शेलार ) गेले दोन दिवस सुरु असलेल्या धुवाधंर पावासामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्यापही काही भागांत पाणी ओसरले नसून कित्येक भाग पाण्याखालीच आहे. वासुन्द्री आणि रूंदा पूल अजूनही पाण्याखालीच आहे. टिटवाळा, कल्याण शहरी ग्रामीण भागातील पावासाच्या पाण्याचा निचारा होत नसल्याने सखल भागात.पुरसंदुश्य परिस्थिती झाल्याने नागरी शहरी ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण तालुक्यातील काळू, बारवी, उल्हास आणि भातसा या नद्यांना पुर आला आल्याने कांबा, टाटा पावर हाऊस, म्हारळ, वरप, येथे रस्त्यावर पाणीच पाणी भरल्याने अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली होती.
उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताच आहे. कांबा गावाच्या समोरच्या मोरया नगर येथील 200 ते 300 खोल्या मध्ये पाणी शिरले शिरून येथील चाळीची घरे पुराच्या पाण्याच्या विळख्यात आली होती.संपूर्ण मोरयानगर पाण्यात बुडाले होते. येथील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. गावभाग, ओमसाईबाबा नगरी, दुर्गानगर, आतमारानगर, आदी परिसरात पाणी आल्याने घरामध्ये 8/1 0फुट पाणी भरल्यामुळे नागरिकांनी घरे सोडून सेक्रेट शाळेत आसरा घेतला होता.
म्हारळ गावातही पुरामुळे राधानगरी, आण्णासाहेब पाटील नगर, बोडके चाळ, सोसायटी वाईन शाँप येथे पाणीच पाणी भरल्याने मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. येथें घराच्या पत्र्यावर काही माणसे अडकून पडले होती. त्यांना रेस्क्यू आँपरेशन करून त्यांचे जीव वाचविण्यात आले.
मांडा टिटवाळा पश्चिम भागात वासुंद्री रोडवरील असलेल्या मराठे चाळीतील एक घर कालच्या पावसामुळे आज पहाटे चारच्या दरम्यान कोसळले असुन यात एक झोपलेले असलेले किरण घोडे आणि कविता घोडे हे दांपत्य जखमी झाले आहेत . तसेच येथील सांगोडा रोडवरील स्मशानभुमीलगत असलेल्या चाळींतील अनेक घरांत पाणी शिरले होते . येथील १३ नागरिकांना पोलिस आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने बोटीच्या साह्याने रेस्कु करत बाहेर काढण्यात आले. तर रूंदे पुल पाण्याखाली गेल्याने १० ते१२गावाचा संपर्क तुटला होता . शहाड येथील मोहने कल्याण रस्ता काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत तर शहाड बंदरपाडा स्लम परिसर मातोश्री. काँलेज परिसर पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीतझाले होते. मोहने यादवनगर सखल भागात चाळीमध्ये पाणी घुसल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले होते. मोहोली येथील उल्हासनदी किनारी असणारे क.डो.म.पा. जलशुद्धीकरण केंंन्द्र पाण्यात बुडाल्याने अनेक सोसायटी आणि चाळीतील रहिवाश्यांना पाण्यावाचून रहावे लागले आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना पावसाच्या साठवलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागला. कल्याण तालुक्यातील काळू, बारवी, उल्हास आणि भातसा या नद्यांना पुर आला आहे. कांबा, टाटा पावर हाऊस, म्हारळ, वरप, येथे रस्त्यावर पाणीच पाणी भरल्याने नदी काठावरील, आपटी,पावशेपाडा, रायते, मानिवली या गावांना पुराचा धोका कायम आहे.
तर कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी काल दिवसभर कल्याण परिसरात छाती एवढ्या पाण्यात फिरून नागरिकांना होणाऱ्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केल्यानंतर आज त्यांनी इंदिरानगर, घरआंगण, जावईपाडा, अमृतत्सिद्धी,विराट हाईट्स इत्यादी परिसराचा पहाणी दौरा केला. यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर,शक्तीवान भोईर,नगरसेवक संतोष तरे हे देखील यावेळी सोबत होते. यावेळी आमदार पवार व उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पावसाचे पाणी जाण्यासाठी नाला नसणे,दूषित पाणी पुरवठा होणे,विकासकाने स्टील पार्किंग मधील जागेत रूम बांधून विकणे इत्यादी प्रामुख्याने समस्या नागरिकांनी मांडल्या. यावेळी मांडा टिटवाळा पश्चिम या भागांत येथील समाजिक कार्यकर्ते रुपेश ( दादा ) भोईर यांच्या वतीने आपतीग्रस्त नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर उद्योजक लाला पाटील यांनी देखील पूरग्रस्त नागरिकांना मोलाचे सहकार्य केले. तसेच कल्याण तालुका पोलिस स्टेशनच्या वरीष्ठ पोलिस निरिक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या संपूर्ण टिम तसेच महावितरण कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग आणि होडी उपलब्ध करुण देणारे विनायक आणि गजानन काळण, सुनिल पाटिल,सिध्दीविनायक युवा संस्थेचे विनायक कोळी , टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशन,संकल्प प्रतिष्ठानचे विजय(भाऊ) मारुती देशेकर ,समाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोइर , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शाखा संपर्क प्रमुख दिलीप राठोड यांनी प्रत्यक्ष उतरुन मदत कार्यात मोलाचे योगदान दिले.
Post a Comment