डोंबिवली विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात ...
दोन वेळा पडले पी.ओ.पी भाग
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) अंबिका हॉटेलचा पी.ओ.पी भाग, डोंबिवली पश्चिमेकडील गोडसे इमारतीचा काही भाग अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू आणि पूर्वेकडील स्टेशनजवळील पावती इमारतील एका दुकानातील पी.ओ.पी भाग पडल्याने पालिका प्रशासनाने धावाधाव करत इमारती रिकामी केली. मात्र महिन्यातून दोनदा डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबास आंबेडकर सभागृहातील पीओपी भाग कोसळूनही पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसली आहे.त्यामुळे येथील कर्मचारी पुरते घाबरले असून त्यांचा जीव धोक्यात आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डोंबिवली येथील पालिकेच्या विभागीय कार्यालयात असणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा भाग कोसळला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा या सभागृहाचा भाग कोसळला आहे. मात्र पालिका कर्मचारी आणि अधिकाºयांनी या सभागृहात असेलेले सामान हालवले असून ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पुन्हा एकदा डोंबिवली येथील पालिका कार्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे सोमर आले आहे. मात्र अद्याापही इमारत दुरूस्त करण्यासाठी कोणतीही हालचाल करण्यात आली नसून पालिका प्रशासन ग आणि फ प्रभागातील कर्मचारी आणि अधिकारी तसेच कार्यालयात कामानिमित्त येणाºया नागरिकांचा य् बळी जाण्याची वाट पहात आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डोंबिवली प्रभाग ग आणि फ येथे इमारतीचे छत कोसळणे, प्लॅस्टर पडणे यासारख्या घडामोडी सातत्याने घडत आहेत. त्यामुळे एकीकडे कल्यण - डोंबिवली महानगरपालिका प्रशासन शहरातील इतर अतिधोकादायक इमारत पाडण्याचे आदेश देत आहे. मात्र दुसरीकडे आपल्यात कार्यालयाची अवस्था प्रशासनाला दिसत नाही का असा सवाल विचारला जात आहे. मे महिन्यातही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग कार्यालयाच्या सभापतींच्या दालनाबाहेरील छताचे प्लास्टर पडले होते. ही इमारत ४८ वर्षापुर्वी बांधण्यात आली आहे. सदर इमारत उभारल्यानंतर ९ ऑगस्ट १९७० रोजी उद्घाटन करण्यात आले. डॉ. बाबसाहेब सभागृहाचे १० फेब्रुवारी १९८० साली उद्घाटन झाले. मात्र गोल्या महिन्याभरात दोन वेळा छताचे प्लॅस्टर कोसळले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे छतही कमकूवत झाले आहे. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. सदर इमारतीच्या छताच्या ठिकठिकाणी खपल्या उडाल्या आहेत. इमारतीतील स्वच्छतागृहातून खालच्या मजल्यावर पाण्याचा अभिषेक होत असल्यामुळे कार्यालयाला गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले आहे. तुटलेल्या लाद्या, तुटके दरवाजे-खिडक्या, गळणारे नळ, भिंतीना वाळवी लागल्याने फायली, कागदपत्रे खराब होत आहेत. छताच्या लोखंडी शिगा बाहेर डोकावत असल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसर सुधारणा योजनेतून या इमारतीच्या जागी नवी सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन शहरातील इतर अति धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश देत आहे. मात्र दुसरीकडे आपल्याच कार्यालयाची अवस्था प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल विचारला जात आहे.

Post a Comment