टिटवाळा :
टिटवाळा येथील योगदान फाउंडेशनच्यावतीने संत
ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र ६० क.डो.म.पा.मांडा
टिटवाळा प.येथे १५ ऑगस्ट स्वतंत्र्यदिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शाळेमधे स्वच्छ
पाणी मिळाव म्हणून निशुल्क पाण्याची प्यूरीफायर मशीन देण्यात आली.
स्वातंत्र्यदिनी
आयोजित केलेल्या कार्यक्रमात वार्ड क्र. ८
च्या नगरसेविका अपेक्षा जाधव ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.यावेळी
जेष्ठ समाज सेवक दळवी मामा यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेच्या
विद्यार्थ्यानी स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर भाषणे केली. टिटवाळ्यातील योगदान फाउंडेशनने यांनी विद्यार्थ्यांना शाळेमधे
स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून निशुल्क पाण्याची प्यूरीफायर मशीन देण्यात
आली. टिटवाळयातील दोन होतकरू तरुणांनी एकत्र येऊन सामजिक बांधिलकी
म्हणून आपलेही योगदान असावे , आपण समाजाचे देणे लागतो या जाणीवेतून योगदान
फाउंडेशन टिटवाला या संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून अनेक ठिकाणी सातत्याने
ते समाजिक उपक्रम राबवीत आहेत. पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन हे संस्थेचे मुख्य उदिष्ट
असल्याचे यावेळी योगदान फाउंडेशनचे अधक्ष्य मदन चव्हाण आणि सचिव रितेश कांबळे
यांनी सांगितले .
या
प्रसंगी शिवसेनेचे टिटवाळा प्रमुख ज्ञानेश्वर मढवीआणि त्यांचे सहकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वहया वाटप केल्या. यावेळी प्रमुख
पाहुणे म्हणून माजी नगर सेवक सुरेश भोईर,बंधेश जाधव,राजेश
दीक्षित, रवि पाटिल,शाळेचे
माजी विद्यार्थी कल्पेश पाटिल, कोषधक्ष मनीष चव्हाण,सल्लागार सुनील शिंदे,
शिक्षक वर्ग डोके सर,खुरकुटे सर,पारधी
सर,पिंगले सर,पाटिल
सर,सामरे मैडम,डांडकर
मैडम, आदिजन उपस्थित होते.
Post a Comment