जागृत महाराष्ट्र चॅनलने राबलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विदयार्थी वर्गात नवचैतन्य II उपक्रम विदयार्थी वर्गासह पालकाला प्रेरणा व उत्साह वाढवणारा ठरला.


 टिटवाळा : अजय शेलार -   जागृत महाराष्ट्र चॅनलने आठ जिल्ह्यात १०० हून अधिक ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी जागृत महाराष्ट्र चॅनलने ग्रामीण भागाशी नाते जोडण्याचे कार्य यशस्वी झाल्याचे सिद्ध केले आहे. चांगल्या व वाईट घडामोडीबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे महान कार्य केले आहे. यातील वृक्ष रोपनाचा उपक्रम हा विदयार्थामधील ऊर्जा वाढवणारा ठरला आहे. भविष्यात अशा उपक्रमाचा वटवृक्ष पाहावयास मिळेल. असे मत रामभाऊ साळवे यांनी व्यक्त केले.
          शेवगाव तालुक्यात भायगाव येथील जिल्हा पायिषद प्राथमिक शाळेत आयोजित ,७३ व्या स्वांतत्र्यदिन निमित्त विविध गुणदर्शन व जागृत महाराष्ट्र चॅनलने आयोजित केलेल्या विदयार्थी / विदयार्थीनी च्या गुणगौरव सोहळा २o१९ या कार्यक्रमामध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
            यावेळी गुणवंत विदयार्थ्याना सन्मानचिन्ह, प्रमाणापत्र, गुलाबपुष्प, श्रीफळ, शाल, मानाचा फेटा, व वृक्षाचे रोपटे भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार आर.आर. माने  म्हणाले. कि सामाजिक उत्सव हे प्रेरणादायी आसतात. त्यांना कलात्मक जोड मिळाल्यास ते आनंददायी ठरतात. त्यासाठी पालक व शिक्षकाच्या विचाराची देवाणघेवाण हि सकात्मक असावी लागते. वास्तवात काम करणाऱ्या संस्था ह्या भान विसतात परंतु जागृत महाराष्ट्र चॅनल याला उपवाद आहे.
 जागृत महाराष्ट्र सारखा चॅनल हे काम निस्वार्थ हेतून करते. यातुन सामाजिक भावना जागृत झाल्याशिवाय राहत नाही. देशभक्तीचे धडे हे सामाजिक जाणिवेतुन दाखवावे लागतात. त्यासाठी ग्रामीण भागाशी आपल्या विचाराची नाळ घट्ट आसणे गरजेचे आहे. असे मत जेष्ठ पत्रकार आर. आर. माने यांनी व्यक्त केले. यावेळी भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, राजेंद्र आढाव बाळासाहेब काळे, शेषेराव दुकळे, भगवान आढाव, अॅड .सागर चव्हाण, संतोष आढाव, आणासाहेब दुकळे, पांडुरंग नेव्हल, राजेंद पाठक, सर्जेराव दुकळे, नानासाहेब दुकळे,रमेश आढाव, आप्पासाहेब सौदागर, राजेंद दुकळे, सुदाम खंडागळे, कृष्णा चव्हाण, हरिभाऊ अकोलकर,
 रोहिणी साबळे, मिरा नितनात, ए.एन. महानोर, के.आर. उंदरे, अश्विनी दुकळे, लता वनवे  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post