डोंबिवली : ( शंकर जाधव ) भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना आणि दिनदयाळ चौक मित्र मंडळाच्या वतीने मदतनिधी उभारण्यासाठी दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिनदयाळ चौकात आयोजित केलेल्या दहीहंडीस अनेक गोंविदा पथकांनी भेट दिली.या गोंविदा पथकाचे स्वागत भारिप बहुजन महासंघाचे कल्याण जिल्हा संघटक राहुल नवसागरे, रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष आनंद नवसागरे, २७ गाव भारिप विभाग प्रमुख अनंत पारदुले, समाजसेवक जयदीप त्रिभुवन,रमेश ढगे, दीपक दाभाडे यांनी केले. या दहीकाला उत्सवाच्या आयोजनाविषयी राहुल नवसागरे म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगली येथील ब्रहनाळ गाव गंभीर पूरस्थिती नंतर पुनर्वसन साठी दत्तक घेतले आहे. आता गावच्या पुनर्वसनाचे फार मोठे आव्हान आहे.यासाठी शक्य तेवढा मदत निधी पाठविण्यासाठी या दहीहंडीचे आयोजन केले आहे. दिवसभर आलेल्या गोंविदा पथकांनी यथाशक्ति निधी अर्पण केला आहे. जितका निधी गोंविदा पथकांकडून आणि नागरिकांकडून जमा होईल तो तहसिलदारांकडे देण्यात येईल. बहुजन वंचित आघाडीने आयोजित केलेल्या हंडीला सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राउत, वाहतूक नियंत्रण शाखेचे वपोनी एस एन जाधव , प्रदिप जगताप , कुणाल नाईक, यांनी शुभेच्छा भेट दिली. सर्वेश साबळे, अजय जगताप, नाना चित्ते, भारत साबळे यांनी दहीहंडी उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
भारिप बहुजन महासंघाची `एक हात पूरग्रस्तांसाठी` दहीकाला उत्सव
mumbaidateline24
0
Post a Comment