टिटवाळा: - डिजिटल इंडिया असा कितीही गवगवा होत असला तरीही प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या ठिकाणी आणि अनके क्षेत्रात आजही बरीचशी कार्यपद्धती रटाळ अशीच असल्याचे दिसून येत आहे. या बाबीकडे टिटवाळा येथील समाजिक कार्यकर्ते ॲड. जितेंद्र जोशी यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील करदात्या नागरिकांना महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सूचना प्रस्ताव तातडीचे निर्णय आपत्कालीन निर्णय हे करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज द्वारे पाठविण्यात यावेत या मागणीसाठी महापालिका आयुक्तांसह महापौर यांना एक निवेदन सादर केले आहे.
महापालिका क्षेत्रातील परिस्थितीबाबत समस्यांबाबत प्रस्तावित योजनांच्या जनसुनावणी बाबत वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत किंवा तातडीच्या स्वरूपात निर्णय घेतले जातात परंतु त्याबद्दल करदाता नागरिक यांना कोणत्याही सूचना न मिळाल्यामुळे करदाते नागरिक जागरूक राहत नाहीत म्हणूनच येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. जितेंद्र जोशी यांनी नागरिकांना आणि नगरसेवकांना कोणत्याही सर्वसाधारण किंवा तातडीच्या निर्णयाची व समस्येबाबतची सुचना म्हणजेच उदाहरणार्थ महापालिकेकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद ठेवणार असल्याबाबतची सूचना, थकीत करभरणा नोटीस पाणी बिल भरणा नोटीस भरणा करण्याची अंतिम तारीख महासभा त्याची सूचना, सभेमध्ये मांडले जाणारे प्रस्ताव, पूरपरिस्थिती, नागरिकांच्या जागृत परिस्थितीबाबत महत्त्वाच्या विकासात्मक कामांकरिता महापालिका प्रशासनाकडून घेतली जाणारी जनसुनावणी , रस्त्यांचे काम सुरू असताना तात्पुरते रस्ते बंद असल्या बाबतच्या सूचना,सण-उत्सव या काळात वाहतुकीमध्ये केले जाणारे बदल, गणेशोत्सवाच्या काळात गणपती विसर्जना करिता प्रस्तावित विसर्जनाची ठिकाण त्यांच्या वेळा, तेथे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा इत्यादी सूचना या पूर्वीप्रमाणे चालत असलेल्या जुनाट पद्धतीने म्हणजे रिक्षातून लाऊडस्पीकर द्वारे मोठमोठ्याने दवंडी पिटवून किंवा पत्रके वाटून नोटिसा देण्याची परंपरा आज देखील तशीच सुरू आहे त्यामुळे सदर पद्धत आजच्या डिजिटलायझेशन मोबाईलच्या युगात खूपच जुनाट व सोयीस्कर नसल्याचे दिसून येत आहे तसेच त्यासाठी लागणारा खर्च तुलनेत देखील अधिक आहे आजही आपल्याकडे दवंडी ठेवण्याची जुनी पद्धत सुरू असल्याबाबत खेद वाटतो असे जोशी यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकारच्या करदात्यांच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेले निर्णय याबाबतची सूचना पत्र लिखित पूर्वसूचना देणे आवश्यक आहे ते वगळता इतर कामांकरिता मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सूचना देऊन सर्व सूचना करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आल्या तर त्यामुळे कामामध्ये सुसूत्रता येऊन आपली महापालिका केवळ नावापुरते न राहता खऱ्या अर्थाने डिजिटल होईल असे मत जोशी यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.
Post a Comment