डोंबिवली : (शंकर जाधव) डोंबविली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या `सक्षम डोंबिवली दौड`मध्ये १२०स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन राधिका गुप्ते यांनी केले होते. यावेळी कॉंग्रेस महिला ब्लॉक प्रेसिडेंट शीला भोसले, दीप्ती दोषी, महाराष्ट्र पर्यावरण विभागाच्या जनरल सेक्रेटरी वर्षा शिखरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
सक्षम डोंबिवली दौड स्पर्धा ५ किमी धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक अर्थव पालव, दुसरा क्रमांक सचिन गौंड,तृतीय क्रमांक गौरव शिरवळकर, ५ किमी धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात श्रुती टोळ,दुसरा क्रमांक चैताली कानटेकर, तृतीय क्रमांक दृष्टी कोयंडे, ३ किमी धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक तेजस कदम, दुसरा क्रमांक विपुल मोरे, तृतीय क्रमांक मिहीर मंगळवेढेकर, ३ किमी धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात तन्वी कदम, दुसरा क्रमांक उदिता चौधरी , तृतीय क्रमांक अनघा रासम यांनी पटकाविला.डोंबिवली पूर्वेकडील अस्तित्व शाळेच्या प्रागणातून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.तेथून स्टेट बँक रोड,एमआयडीसी ते ९० फीट रोड, परत अस्तित्व शाळेच्या प्रागणात असा स्पर्धेचा मार्ग होता.या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. या स्पर्धेत जहागिरदार व रत्नपारखी या ज्येष्ठ नागरिकांचे विशेष कौतुक करण्यात आले. या स्पर्धेतअस्तित्व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश आडकर यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेचे नियोजन अजित शिरवाडकर आणि नीता शिरवाडकर यांनी केले तर प्रसाद दारवेरकर व मोरे यांनी सहकार्य केले.
Post a Comment